सिंधुदुर्ग today
नांदगाव ओटव ब्रिज वरील पथदिवे पुन्हा १०० % बंद.
सुरळीत केल्यानंतर पावसाच्या सरी आल्यावर पुन्हा बंद.
केसीसी कंपनीकडून कायम स्वरुपी उपाय का होईनात ?
ग्रामस्थ संतप्त; दोन दिवसांत कायमस्वरूपी उपाययोजना न केल्यास आंदोलनचा दिला इशारा.
नांदगाव (ऋषिकेश मोरजकर)
मुंबई गोवा महामार्गावरील नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्र असलेला नांदगाव - ओटव फाटा आरोग्य केंद्र जवळील ब्रिज वर १०० % पथदिवे बंद अवस्थेत असल्याने सर्व अंधार पसरलेला आहे.यामुळे पथ दिवे असले तर शो साठी आहेत का ? असा सवाल ग्रामस्थांमधून केला जात आहे. कंपनी फक्त
तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्ती करून पुन्हा येरे माझ्या मागल्या साध्या पावसाच्या सरी जरी कोसळल्या तरी सदर पूर्ण लाईट बंद पडते. यामुळे अंधाराचा फायदा घेऊन या ब्रिजच्या खाली तसेच सर्विस रस्त्यालगत रात्री उशिरापर्यंत दारू पिण्यासाठी बसतात . आणि याचा त्रास रात्र जेवण आटपल्यानंतर शतपावली करणाऱ्या ग्रामस्थ तसेच महिलांना होत आहे. यामुळे येथील ग्रामस्थ संतप्त झाले असून येत्या २ दिवसांत पथदिवे वारंवार का बंद पडतात यावर कायमस्वरूपी उपाययोजना न केल्यास तिव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा नांदगाव येथील ग्रामस्थांनी दिला आहे.केल्यास आंदोलनचा पवित्रा घेतला जाणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे..

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा