सिंधुदुर्ग today



नांदगाव येथे राबविण्यात आली स्वच्छता मोहीम.

प्लास्टिकचा भस्मासुर टाळा - सभापती - सौ हर्षदा वाळके. 

स्वच्छतेसाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे सरपंच भाई मोरजकर यांचे आवाहन.

नांदगाव (ऋषिकेश मोरजकर )

नांदगाव ग्रामपंचायत व सदगुरू निरंकारी महाराज संप्रदायाचे सहकारी यांच्या वतीने  नांदगाव तिठा येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

       यावेळी कणकवली पंचायत समिती सभापती सौ हर्षदा वाळके यांनी जनतेला आवाहन करताना सांगितले की, आज कचरा गोळा करताना प्लास्टिक कचरा भरमसाठ वाढ झाली आहे. त्यामुळे प्लास्टिक भस्मासुर टाळण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.



    तर नांदगाव सरपंच भाई मोरजकर यांनी आपण जवळपास तिनं महिन्यात तीनदा स्वच्छता अभियान राबविले असून हे अभियान राबविण्याची गरजच भासणार नाही यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने योगदान दिले पाहिजे. व कचरा टाकताना इतरत्र कुठेही कचरा न टाकता ग्रामपंचायत मार्फत ठेवलेल्या कचरा कुंडीतच कचरा टाकेन असा निश्चय करून आपापल्या परिसरात स्वच्छता अबाधित ठेवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.

     यावेळी कणकवली पंचायत समिती सभापती सौ हर्षदा वाळके, नांदगाव सरपंच भाई मोरजकर, उपसरपंच इरफान साटविलकर, ग्रामपंचायत अधिकारी आर.डी.सावंत , ग्रामपंचायत सदस्य संतोष बिडये, विठोबा कांदळकर, अक्षता खोत , रिक्षा संघटना अध्यक्ष किशोर मोरये, विजय महाडेश्वर, प्रफुल्ल तोरसकर, अंगणवाडी सेविका, आशा सेविका तसेच नागरिक व सद्गुरू निरंकारी महाराज संप्रदायाचे सहकारी उपस्थित होते.

टिप्पण्या