सिंधुदुर्ग today

 


गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत योजना

कणकवली /प्रतिनिधी 

गेल्या २० वर्षांपासून दिशा परिवार चॅरिटेबल ट्रस्ट गरजू व होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सातत्याने कार्यरत आहे. उत्तम गुणवत्ता आणि शिक्षणाची जिद्द असूनही आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये या उद्देशाने दिशा परिवार समाजातील दानशूर व्यक्ती आणि अशा विद्यार्थ्यांना एकत्र जोडण्याचे कार्य करत आहे.

शैक्षणिक मदतीसाठी अटी व पात्रता

कला, वाणिज्य, शास्त्र, अभियांत्रिकी ( शासकीय महाविद्यालय) आर्किटेक्चर, कृषी, फार्मसी, नर्सिंग मध्ये शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या आणि इ. १२ वी मध्ये ८०% गुण असणाऱ्या गरजू व गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांचा विचार केला जाईल.

इयत्ता १०वी नंतर डिप्लोमासाठी महाराष्ट्रातील कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश घेणारे गरजू विद्यार्थी अर्ज करू शकतात.

सदर मदतीमध्ये कॉलेजची फी, राहणे, जेवणे यासाठी उपलब्ध निधीनुसार मदतीचा विचार केला जाईल.

महाराष्ट्रातील गरजू विद्यार्थी; ज्यांचे पालक शेत मजूर, अल्प भू धारक, अल्प उत्पन्न धारक आहेत अथवा ज्या विद्यार्थ्यांचे पालक हयात नाहीत अशा विद्यार्थ्यांचा मदतीसाठी प्राधान्याने विचार केला जाईल.

अर्ज प्रक्रिया व महत्त्वाच्या सूचना

अर्ज स्वीकारण्याचा कालावधी : दि. १ जुलै २०२६ ते १२ जुलै २०२६

अर्ज करण्यासाठी खालील दोन्ही प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे खालील लिंक वर गेल्यावर आपल्याला दोन पर्याय उपलब्ध होतील 

१. ऑनलाइन अर्ज

ऑनलाइन अर्ज भरावा, अर्जातील सर्व माहिती अचूक व संपूर्ण भरावी.

अर्ज अपलोड झाल्यानंतर आपल्या अर्जाचा एक नंबर येईल तो नंबर ॲाफलाईन अर्जात लिहायचा आहे 

१. ऑफलाइन अर्ज

PDF स्वरूपातील अर्ज डाउनलोड करावा.

अर्जाची प्रिंट काढून संपूर्ण माहिती भरावी.

https://dishapariwar.org.in/scholarship

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रेः

भरलेला ऑफलाइन अर्ज व स्वहस्ताक्षरातील विनंती अर्ज

२ पासपोर्ट साईज फोटो

इ. १० वी / १२ वी गुणपत्रिका (लागू असल्यास)

चालू शैक्षणिक प्रवेश पावती व महाविद्यालयाचे फी स्ट्रक्चर

आधार कार्ड, रेशन कार्ड व वीज बिल

उत्पन्नाचा दाखला

शेतकरी असल्यास ७/१२ व ८-अ उतारा / भूमीहीन दाखला

पालक हयात नसल्यास संबंधित दाखला (लागू असल्यास).

वसतिगृहाची पावती / प्रमाणपत्र (लागू असल्यास)

महत्त्वाची सूचना : ऑफलाइन व ऑनलाइन अशा दोन्ही प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.

रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी अर्ज खालील पत्त्यावर स्पीड पोस्टाने सर्व कागदपत्रांसहित पाठवावेत.

शैक्षणिक मदत उपलब्ध निधीनुसार दिली जाईल. मदत मंजूर अथवा नाकारण्याचे अंतिम अधिकार संस्थेकडे राखीव आहेत

अधिक माहीती साठी खालिल नंबर वर संपर्क करावा 

गजानन जोशी 

94059 55636

अर्ज पाठवायचा पत्ता 

दिशा परिवार चॅरिटेबल ट्रस्ट 

द्वारा अनंत रानडे , रानडे ब्रदर्स 

२२ बाजारपेठ राजापूर जिल्हा रत्नागिरी ४१६७०२ 

फोन नंबर 9860021082

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today