सिंधुदुर्ग today
सिंधुदुर्गसाठी मोठी बातमी: खासदार नारायण राणे यांच्या प्रयत्नातून 'प्रधानमंत्री ग्राम सडक योजने'तंर्गत ४७ कोटींपेक्षा अधिक निधीचे १२ पूल मंजूर!
सिंधुदुर्ग: (ऋषिकेश मोरजकर)
सिंधुदुर्ग-रत्नागिरीचे खासदार नारायण राणे यांच्या विशेष प्रयत्नातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण रस्ते आणि दळणवळण व्यवस्थेला मोठा वेग मिळणार आहे. 'प्रधानमंत्री ग्राम सडक योजना-भाग ३' (PMGSY-III) अंतर्गत जिल्ह्यातील विविध तालुक्यांसाठी एकूण ४७ कोटी ३६ लाख ६४ हजार रुपये निधीच्या १२ मोठ्या पुलांच्या (LSB) कामांना मंजुरी मिळाली आहे.
या विकासकामांमुळे जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क सुलभ होणार असून, पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या वाहतुकीच्या समस्या कायमच्या मिटणार आहेत.
तालुकानिहाय मंजूर पुलांची यादी आणि खर्च (लाखांत):
१. देवगड तालुका:
फणसगाव महाळुंगे रस्ता (कि.मी. ६/२४०): २४ मीटर लांबीच्या पुलासाठी २ कोटी ७१.५८ लाख रुपये मंजूर.
२. दोडामार्ग तालुका:
पाडवे कोलझर कुंभवडे पणतुर्ली रस्ता (साखळी २/५५०): २२ मीटर लांबीच्या पुलासाठी २ कोटी ७८.०५ लाख रुपये मंजूर.
भेडेशी खान्याळे शिरंगे पुनर्वसन रस्ता (सापुलासाठी ३ कोटी ४७.५८ लाख रुपये मंजूर.
३. कणकवली तालुका:
नाटळ ते रामेश्वर मंदिर ते थोरले मोहूळ खरातवाडी रस्ता (साखळी २+३७५): २८ मीटर लांबीच्या पुलासाठी ३ कोटी २९.१३ लाख रुपये मंजूर.
४. कुडाळ तालुका (सर्वाधिक ५ पूल मंजूर):
झाराप रेल्वे स्टेशन ते साळगाव माणगाव रस्ता (साखळी ८/८८०): ३० मीटर पूल – ३ कोटी ३८.१५ लाख रुपये.
झाराप रेल्वे स्टेशन ते साळगाव माणगाव रस्ता (साखळी ११/९६०): २० मीटर पूल – २ कोटी २७.२५ लाख रुपये.
घावनळे नाणेली माणगाव रस्ता (साखळी ६/४५०): १०५ मीटरचा मोठा पूल – १० कोटी ८२.८९ लाख रुपये.
घावनळे नाणेली माणगाव रस्ता (साखळी ४/६४०): ३० मीटर पूल – ३ कोटी ३८.०७ लाख रुपये.
मुंबई-गोवा महामार्ग (NH66) ते साळगाव माळा सावंतवाडा रस्ता (साखळी ०/५००): ४० मीटर पूल – ३ कोटी ४४.४६ लाख रुपये.
मुंबई-गोवा महामार्ग (NH66) ते साळगाव माळा सावंतवाडी रस्ता (साखळी ०/८६०): ३० मीटर पूल – २ कोटी ४७.२१ लाख रुपये.
५. मालवण तालुका:
आचरा भगवंतगड रस्ता (साखळी ४/५००): ६० मीटर लांबीच्या पुलासाठी ६ कोटी ९०.५ लाख रुपये मंजूर.
६. सावंतवाडी तालुका:
बांदा फिश मार्केट बांदेश्वर मंदिर ते सटमट डिंगणे रस्ता (साखळी १/४७०): २४.०५ मीटर पुलासाठी २ कोटी ४१.७७ लाख रुपये मंजूर.
एकूण विकास निधी:
या सर्व १२ पुलांची एकूण लांबी सुमारे ४७३ मीटर असून, यासाठी ४७ कोटी ३६ लाख ६४ हजार रुपयांचा भव्य निधी खर्च केला जाणार आहे.
खासदार नारायण राणे यांनी जिल्ह्यातील जनतेला दिलेला शब्द पाळत, ग्रामीण भागातील दळणवळण अधिक सक्षम करण्यासाठी हा निधी मंजूर करून आणल्याने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून त्यांचे आभार मानले जात आहेत. या पुलांच्या कामांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि मोठी चालना मिळणार आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा