सिंधुदुर्ग today
नांदगाव मंडळ येथील छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबीराला उस्फुर्त प्रतिसाद.
प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दिक्षांत देशपांडे यांची उपस्थिती.
नांदगाव (ऋषिकेश मोरजकर)
छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबीर अभियान आज महसूल विभाग, महाराष्ट्र शासन जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग, उपविभागीय कार्यालय कणकवली , तहसिलदार कार्यालय कणकवली मंडळ नांदगाव यांच्या वतीने नांदगाव येथे संपन्न झाले
. नांदगाव मधलीवाडी येथील महापुरुष सेवा संघ सभागृहात संपन्न झालेल्या शिबिराचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी जगदीश कातकर यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी कणकवली तहसीलदार दिक्षांत देशपांडे, कणकवली सभापती सौ हर्षदा वाळके, नांदगाव सरपंच भाई मोरजकर, मंडळ अधिकारी आत्मबोध जाधव, तलाठी अम्रीता चौगुले,मंडळ मधील सर्व तलाठी, पोलीस पाटील, कोतवाल तसेच नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
या अभियानांतर्गत प्रलंबित फेरफार , 7/12 मधील चुकांची दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीचे 7/12 आणि 8-अ उताऱ्यांचे वाटप , उत्पन्न, रहिवासी आणि जातीचे प्रमाणपत्र , नॉन-क्रीमिलेअर प्रमाणपत्र अकृषिक (NA) तरतुदींबाबत मार्गदर्शन व सुधारणा, नवीन व्यवस्थापनानुसार सनद प्रक्रियेची माहिती, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभ मंजूर करणे, विद्यार्थ्यांसाठी दाखले वाटप तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंघनाबाबतच्या प्रकरणांचा निपटारा ॲग्रीस्टॅक आणि पी.एम. किसान नोंदणी
आधार अपडेट आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. नांदगाव मंडळाच्या या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
कार्यक्रम सुत्रसंचलन राजेश कदम , प्रास्ताविक तहसीलदार दिक्षांत देशपांडे तर आभार तोंडवली बावशी तलाठी अम्रीता चौगुले यांनी मानले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा