सिंधुदुर्ग today



तोंडवली बोभाटेवाडी येथील क्रशर विरोधात उपोषण सुरुच.

क्रशर बंद साठी ग्रामस्थ आग्रही.

कणकवली प्रतिनिधी
कणकवली तालुक्यातील तोंडवली येथे देवगड निपाणी राज्य मार्गाच्या सिमेंट कॉंक्रीट रस्ता कामासाठी क्रशर मुळे परीसरातील ५१ घराना तडे व धुळीचे साम्राज्य पसरले असल्याने नागरीकांच्या जीवितास धोकादायक
झाल्याने आज सकाळी १० पासून उपोषणाला सुरुवात झाली असून. आता सायंकाळी ७.३० पर्यंत तोडगा न निघाल्याने अद्याप उपोषण सुरूच आहे.
     दरम्यान मंडळ अधिकारी नांदगाव तसेच तलाठी तोंडवली बावशी यांनी उपोषण मागे घेण्यासाठी विनंती केली. मात्र ग्रामस्थ जोपर्यंत क्रशर बंद करण्याचा आदेश देत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.
      या उपोषणाला माजी परशुराम उपरकर, कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी भेट देऊन पाठींबा दिला.
   यावेळी दाजी सदडेकर, चंद्रकांत बोभाटे, अतुल बोभाटे, दिपक शिरसाट , तेजस बोभाटे , तात्या निकम,आबु मेस्त्री, सुनिल बोभाटे , संतोष बोभाटे तसेच महिलांची ही उपस्थिती लक्षणीय आहे.
       या उपोषणास्थळी कणकवली पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. तर उन्हात कोणाला त्रास होऊ नये म्हणून आरोग्य विभागाने हजेरी लावली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today