सिंधुदुर्ग today



कवी हरिचंद्र भिसे यांच्या रानपुराण काव्यसंग्रहाचे रविवारी सावंतवाडीत प्रकाशन

बांदा/ प्रतिनिधी

    बांदा येथील प्रतिष्ठित नागरिक तथा कवी हरिचंद्र भिसे यांच्या प्रभा प्रकाशन कणकवलीतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या 'रानपुराण ' या दीर्घ कविता संग्रहाचे प्रकाशन रविवार 12 रोजी सायं. 5 वा. सावंतवाडी श्रीराम वाचन मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या आंबेडकर चौक साहित्य संमेलनात करण्यात येणार आहे. ज्येष्ठ कवी वीरधवल परब यांच्या हस्ते या काव्यसंग्रहाचे प्रकाशन होणार असून काव्य रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

     कवी हरिचंद्र भिसे हे गेली अनेक वर्ष निष्ठेने काव्य लेखन करत असून हा त्यांचा चौथा काव्यसंग्रह प्रकाशित होत आहे. वेगवेगळ्या भागातील निमंत्रित कवींच्या कवी संमेलनात कवी भिसे यांनी कविता वाचन केले असून वेगवेगळ्या अंकांमध्येही त्यांच्या कविता सातत्याने प्रकाशित होत असतात. रानपुराण ही त्यांची दीर्घ कविता असून मराठी साहित्याच्या अभ्यासक डॉ.निर्मोही फडके यांनी या काव्यसंग्रहाची पाठराखण अतिशय समर्थ शब्दात केली आहे.डॉ.फडके या संग्रहाबद्दल म्हणतात की, रानपुराण' हे सकृतदर्शनी रानाबद्दल लिहिलेले पुराण असले, तरी ते अवघ्या निसर्गचक्राचे  आणि त्याच्यातच गुंफल्या गेलेल्या मानवी जीवन-जाणिवांचे गीत आहे. रानापासून तुटत जाण्याची वेदना उमजणाऱ्या एका कविमनाची ही उलघाल ह्या दीर्घ कवितेतून आपल्यासमोर येते. कविता लिहिण्यासाठी कवीकडे एक अतितरल संवेदन असणे गरजेचे असते. त्यामुळे, दीर्घ कविता लिहिणे हे आव्हानात्मक असते. कवी हरिश्चंद्र भिसे ह्यांनी ते स्वीकारले आहे. 'रानपुराण' ही दीर्घ कविता वाचकाला त्याचे बोट धरून शब्दांच्या अनेक पाझरवाटांवरून घेऊन जाते आणि आशयाच्या रानात मोकळे सोडून देते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today