सिंधुदुर्ग today
वेश्याव्यवसाय चालविल्या प्रकरणी तिघांची निर्दोष मुक्तता
अँड उमेश सावंत यांनी पाहीले काम.
कणकवली / प्रतिनिधी
शहरातील लक्ष्मीकृपा लॉज येथे सुरू असलेल्या अनधिकृत वेशाव्यवसाय प्रकरणी सिंधुदुर्ग पोलिसांच्या महिला अत्याचार निवारण कक्षाने केलेल्या कारवाईमधील संशयित मालक बाबुराव नारायण सांडव, नोकर महंम्मद गौस साटविलकर रा. नांदगाव व संग्राम बोडके रा. कोल्हापूर यांची प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधिश डॉ. सुधीर देशपांडे यांनी निर्दोष मुक्तता केली. संशयितांच्यावतीने अॅड उमेश सावंत यांनी काम पाहिले.
दि. १८ डिसेंबर २०१८ रोजी पोलीस अधिक्षक सिंधुदुर्ग यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार महिला अत्याचार निवारण कक्षाचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद पाटील यांनी त्यांच्या पथकासह शहरातील लक्षीकृपा लॉज येथे पंच व बनावट ग्राहकांसह छापा घातला. बनावट ग्राहकाला १५०० रुपये लॉजमध्ये पाठविले. त्याने दिलेल्या इशाऱ्यावरून पोलीस व पंचानी प्रवेश केला त्यात मालक बाबुराव सांडव तसेच नोकर महंम्मद साटविलकर है आढळले. तसेच दोना महिलाही आढळल्या. त्या मुंबई व कोल्हापूर येथून वेशा व्यवसायासाठी आल्याचे कबुल केले. याबाबत त्यांचा मध्यस्थ संग्राम बोडके यालाही अटक करण्यात आली. महिला अत्याचार निवारण कक्षाच्या पोलीस नीता चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भा.दं.वि. कलम ३७० व अनैतक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३ ते ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणी अभियोग पक्षातर्फे चार साक्षीदारांच्या साक्षी झाल्या. साक्षीतील विसंगती व नृटीव पुराव्याची कमतरता यामुळे सरकारपक्षाचा खटला संशयातीतपणे सिद्ध होऊ न शकल्याने, घटनास्थळ शाबीत न झाल्याने संशयितांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा