सिंधुदुर्ग today


तोंडवली बोभाटेवाडी येथील क्रशर मुळे घरांना तडे.

ग्रामस्थ १५ एप्रिल च्या आमरण उपोषणावर ठाम.

कणकवली /प्रतिनिधी

कणकवली तालुक्यातील तोंडवली येथे देवगड निपाणी राज्य मार्गाच्या सिमेंट कॉंक्रीट रस्ता कामासाठी क्रशर मुळे परीसरातील घराना तडे व धुळीचे साम्राज्य पसरले असल्याने नागरीकांच्या जीवितास धोकादायक असल्याचे येथील नागरीकांनी जिल्हाधिकारीसह इतर प्रशासनासह व सबंधित ठेकेदार कंपनीस पत्रव्यवहार करून क्रशर बंद करण्यात यावा अशी मागणी निवेदन देत करण्यात आली. 

        दरम्यान यावर कुठलाही प्रकारे शासन स्तरावर हालचाल न करता क्रशर सुरु असल्याने १५ एप्रिल २०२६ रोजी चे तोंडवली येथील क्रशरच्या समोरच आमरण  उपोषण होणारच असल्याचा ईशारा नागरिकांनी दिला आहे.

         तत्पूर्वी माहिती घेतली असता देवगड निपाणी राज्य मार्गाचे सिमेंट कॉंक्रीट काम सुरू करताना ठेकेदार कंपनीकडून तोंडवली येथील सहा एकर जागेत क्रशरचे काम चालू करून उत्खनन करण्यात आले होते.काही दिवस काम झाल्यानंतर खोलीईची पातळी खाली गेल्यावर येथे लावण्यात आलेला सुरुंग यामुळ परिसरातील १५० ते २०० फूटावर पूर्वेकडे ग्रामदैवत पावणाई देवीचे मंदिर व पश्चिम दिशेस चार वाड्या या भागात याचा परिणाम होत परिसरातील घराना तडे व धुळीचे साम्राज्य होत भातशेती व काजूच्या बागा याचे नुकसान होत असल्याचे दिसून आले.

       या क्रशरमुळे ५१ घरे बाधित असून त्याचबरोबर परीसरातील पाण्याची पातळी खालवली जात आहे.त्याच अनुशंगाने ग्रुप ग्रामपंचायत तोंडवली-बावशीच्या २९ मार्च २०२५ च्या ग्रामसभेत ग्रामस्थांकडून उत्खनन विरोध करीत ठराव मंजूर करण्यात आला आहे.तर तंटामुक्त समितीच्या सभेतही याबाबत ग्रामस्थांचा उद्रक होत कायमस्वरूपी क्रशर बंद करण्यात यावा असा निर्णय झाला आहे.तसेच याबाबत जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग,प्रातांधिकारी कणकवली,जिल्हा खनिकर्म अधिकारी, गटविकास अधिकारी, तलाठी, मंडळाधिकारी,सरपंच,ग्रामपंचायव अधिकारी याना पत्रव्यवहार केलेला असून नियोजित १५ एप्रिल २०२६ रोजी चे तोंडवली बोभाटेवाडी येथील येथील क्रशरच्या समोरचे आमरण  उपोषण होणारच असल्याचा ईशारा दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today