सिंधुदुर्ग today
आजीला लुटल्याप्रकरणी नातवासह दोघांना जामीन मंजूर
अँड उमेश सावंत यांनी पाहीले काम
कणकवली : प्रतिनिधी
ओटव, ओटववाडी येथे स्वतःच्या आजीच्या घरात घुसून दरोडा टाकणारा नातू साहिल उर्फ सिद्धेश मिलिंद रसाळ (२१) आणि मुकेश महेंद्र पाटणे (२८) यांना येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. जी. लटुरिया यांनी प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या सशर्थ जाचमुचलक्यावर मुक्तता करण्याचे आदेश दिले आहेत. आरोपीतर्फे अॅङ उमेश सावंत, अॅङ नेहा ताम्हणकर व अॅङ जुई उबाळे यांनी काम पाहिले.
दि. २२ एप्रिल २०२४ रोजी आरोपीनी संगनमाने ओटव येथील आजी सुवर्णा रावले हीच्या घरात चेहऱ्याला मास्क लावून घुसून तीच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची चेन व साडेनऊ ग्रामची दुसरी चेन असा १ लाख ४५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. याबाबत स्थानिक गुन्हा अन्वेषनने कारवाई करत दोघांना मीरा-भाईंदर येथून अटक केली होती. त्यानंतर त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर आरोपींच्या पोलीस कोठडीची पुन्हा मागणी करण्यात आली होती. ती फेटाळत न्यायालयीन कोठडी देण्यात आली. त्यानंतर आरोपींच्यावतीने दाखल जामिन अर्जावर निर्णय देताना न्यायालयाने तपासात सहकार्य करावे, पुराव्यात ढवळाढवळ करू नये, पोलीस स्टेशनला दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी हजेरी लावावी, अशा अटींवर प्रत्येकी २५ हजारांच्या जाचमुचलक्यावर मुक्तता करण्याचे आदेश दिले आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा