सिंधुदुर्ग today
नांदगाव ओटव ब्रिज वरील पथदिवे ५० % बंदच.
ब्रिजवरील साईट संरक्षण कठड्याला झाडेही होत आहेत मोठी.
कणकवली प्रतिनिधी
मुंबई गोवा महामार्गावरील नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्र असलेला ओटव ब्रिज वर ५० % पथदिवे बंद अवस्थेत असल्याने सर्व अंधार पसरलेला आहे.यामुळे पथ दिवे असले तर शो साठी आहेत का ? असा सवाल ग्रामस्थांमधून केला जात आहे. तरी येत्या ४ दिवसांत पथदिवे सुरू न केल्यास आंदोलनचा पवित्रा घेतला जाणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे.
तसेच या ब्रिजवर असलेल्या साईट संरक्षण कठड्याला छोटी मोठी झाडे वाढलेली आहेत. तरी त्यांची पाळेमुळे मोठ्या प्रमाणात होण्याअगोदरच ती छाटून घ्यावी अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा