सिंधुदुर्ग today
पत्रकार संघाच्यावतीने अपघातग्रस्तांना मदत केल्याबद्दल भगवान लोके यांचा सत्कार.
कणकवली : प्रतिनिधी
कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके यांनी सामाजिक बांधिलकी जोपासून मानवतेच्या भावनेतून मुंबई गोवा महामार्गावर हुंबरठ चढावावर दुचाकी अपघातग्रस्त विव्हळत पडलेले लबिक पटेल , केतन वाडे या दोघांना स्वत: कारमध्ये घेवून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, त्यामुळे त्या दोघांचेही प्राण वाचण्यास मदत झाली आहे.
त्याबद्दल कणकवली पत्रकार संघाच्या वतीने जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष राऊळ यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात आले.यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे कार्यकारणी सदस्य लक्ष्मीकांत भावे, ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर ,रमेश जोगळे, चंद्रशेखर देसाई, सुधीर राणे, अजित सावंत , तालुका सेक्रेटरी संजय सावंत,खजिनदार रोशन तांबे, तुषार हजारे, राजन चव्हाण , विरेंद्र चिंदरकर, नंदकिशोर कोरगांवकर, संजय बाणे , उमेश बुचडे, विनय सावंत , उल्का तावडे , अस्मिता गिडाळे , रमाकांत बाणे , गणेश पारकर , विनोद जाधव , तुळशीदास कुडतडकर यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा