सिंधुदुर्ग today



तोंडवली बोभाटेवाडी येथील क्रशर विरोधात उपोषण स्थळी तहसीलदार यांनी दिली भेट 

ई.टी.एस. मोजणी होईपर्यंत क्रशर बंदचा लेखी आदेश द्यावा.

ग्रामस्थांची मागणी; उपोषण सुरूच.

कणकवली /प्रतिनिधी

कणकवली तालुक्यातील तोंडवली येथे देवगड निपाणी राज्य मार्गाच्या सिमेंट कॉंक्रीट रस्ता कामासाठी क्रशर मुळे परीसरातील ५१ घराना तडे व धुळीचे साम्राज्य पसरले असल्याने नागरीकांच्या जीवितास धोकादायक

झाल्याने आज सकाळी १० पासून उपोषणाला सुरुवात झाली असून. आता सायंकाळी ७.३० पर्यंत तोडगा निघाला नव्हता ७.३० नंतर कणकवली तहसीलदार दिक्षांत देशपांडे, कणकवली पोलीस निरीक्षक तेजस नलवडे यांनी भेट देत आंदोलनकांशी चर्चा करुन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली मात्र ई.टी.एस मोजणी करावी व एटी.एस.मोजणी होईपर्यंत क्रशर बंद करण्याचा आदेश द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

     यावेळी मंडळ अधिकारी आत्मबोध जाधव ,तोंडवली बावशी तलाठी चौगुले, तोंडवली पोलीस पाटील विजय मोरये तसेच पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

   ई.टी.एस. मोजणी ही भूमी अभिलेख, महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे जमिनीतील अनधिकृत उत्खनन (खनिज, दगड खाणी) किंवा जमिनीच्या हद्दी मोजण्यासाठी वापरली जाणारी अत्याधुनिक डिजिटल पद्धत आहे. यात ईटीएस मशीनद्वारे अचूक मोजमाप करून खाणमालकाने परवानगीपेक्षा जास्त किती उत्खनन केले आहे, हे शोधले जाते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today