सिंधुदुर्ग today
देवगड तालुक्यातील वानिवडे गावातील उ.बा.ठा चे ग्रामपंचायत सदस्य व असंख्य ग्रामस्थांचा भाजप पक्षामध्ये प्रवेश आमदार नितेश राणे यांच्या वानिवडे गावातील चालू असलेल्या विकास कामांचा धडाका बघून पक्षप्रवेश कणकवली प्रतिनिधी देवगड तालुक्यातील वानिवडे मधील उबाठाचे कार्यकर्ते रमेश श्रीधर प्रभू ग्राम.प.सदस्य,चेतना महादेव बामणे ग्राम.प.सदस्य, चंद्रकांत बामणे, दत्ताराम कोतेकर,गणपत प्रभु, सुहास प्रभु, संतोष घाडी, सुनिल मुळीक, भालचंद्र बामणे, रविंद्र बामणे, रामदास मासये, प्रदिप घाडी,यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे ठरवलं असून त्यामुळे वानिवडे गावातील ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातो आहे. यावेळी आमदार नितेश राणे,अमोल तेली,बाळा खडपे, बापू घाडी, सरपंच सुयोगी घाडी, आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.