सिंधुदुर्ग today



नांदगाव वीज प्रश्नी विज ग्राहक संघटना आक्रमक.

जिल्हा, तालुका तसेच नांदगाव विज ग्राहक संघटनेने घेतली  प्रभारी कार्यकारी अभियंतांची भेट.

सोमवार चे आंदोलन होणारच; विज ग्राहक ठाम.

नांदगाव येथे पुढील आठवड्यात वीज ग्राहकांचा मेळावा; प्रभारी कार्यकारी अभियंतांनी दिले आश्वासन 

कणकवली (ऋषिकेश मोरजकर)

कणकवली तालुक्यातील नांदगाव पंचक्रोशीतील वीज प्रश्नी विज ग्राहक संघटना आक्रमक पवित्रा घेतला असून आज दिवसभरात विज ग्राहक संघटना तसेच विज ग्राहक यांनी प्रभारी कार्यकारी अभियंतांची भेट घेत चर्चा केली आहे. 

      या चर्चेत वारंवार विज पुरवठा खंडित होणे हा प्रामुख्याने विषयावर चर्चा करण्यात आली आहे. सरतेशेवटी तळे बाजार ते असलदे सबस्टेशन पर्येंत पर्याय लाईन ची व्यवस्था करण्यात यावी याबाबत जो ४ ते ५ वर्षांपासून पेंडीग प्रस्तावावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.यावर प्रभारी कार्यकारी अभियंता श्री बगाडे यांनी तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन देत तशी कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

       विज ग्राहक संघटना जिल्हा समन्वयक अँड .नंदन वेंगुर्लेकर, कणकवली तालुका व्यापारी संघटना अध्यक्ष दिपक बेलवलकर, राजेश राजाध्यक्ष, नांदगाव सरपंच भाई मोरजकर, असलदे माजी सरपंच पंढरी वायंगणकर, नांदगाव व्यापारी संघटना अध्यक्ष पप्पी सापळे,प्रदीप हरमळकर, रंजन चिके , , साई आंबेरकर , कोकण रेल्वे समन्वय समिती अध्यक्ष प्रकाश पावसकर ,सुकळवाड माजी सरपंच स्वप्नील गावडे आदी उपस्थित होते.

 जिल्हा विज ग्राहक संघटनेने धरले धारेवर

याबाबत जिल्हा विज ग्राहक संघटना तालुका संघटना नांदगाव विभागातील वारंवार वीज पुरवठा खंडित हा विषय गेल्या तीन वर्षापासून आहे यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी प्रस्तावही तयार करण्यात आला होता पण या प्रस्तावाचे पुढे काय झाले ? या प्रस्तावाला याच विभागातून पुढील मान्यता देण्यात आलेली नाही असेही या बैठकीत समजले .आता या प्रस्तावना पुढील कार्यवाहीसाठी पातळीने हालचाल सुरू झाली असल्याचे निदर्शनास आले. 

    सोमवार चे नांदगाव येथील आंदोलनावर ग्राहक ठाम

    नांदगाव पंचक्रोशीतील वारंवार होणारा वीस पुरवठा यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे व्यापारी वर्ग म्हणा गणेश मूर्ती बनवणारे मूर्तिकार त्याचप्रमाणे वारंवार खंडित मुळे विद्युत उपकरणांचा बिघाड होणे 

त्यामुळे येथील वीज ग्राहक मेटाकुटीला आले आहे. त्यांनी मागील सोमवारीच नांदगाव विद्युत अभियंता यांना लेखी स्वरुपात निवेदन देऊन आठ दिवसात याची सुधारणा न झाल्यास सोमवार दिनांक 29 जुलै 2024 रोजी कार्यालया आंदोलन करण्याचा इशारा दिला होता त्या अनुषंगाने पुन्हा एकदा थांब भूमिका नांदगाव पंचक्रोशीतील वीज ग्राहक संघटनेने घेतलेली असून सोमवार चे नियोजित आंदोलन होणारच आहे. व त्यावेळी विज वारंवार खंडित होऊनही जी भरमसाठ वीज बिले आली आहेत या वीज बिलांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय विज ग्राहक संघटना घेत आहे.असे ठामपणे सांगितले आहे.

 दिवसभरात नांदगाव पंचक्रोशीतील दोन शिष्टमंडळाने दिली भेट

या अन्यायकारक होणाऱ्या वारंवार वीज पुरवठा खंडित मुळे काल दिवसभरात सकाळच्या सत्रात असलदे येथील बहुसंख्य विज ग्राहकांनी कणकवली येथील कार्यालयाला धडक दिली. त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी जिल्हा विज ग्राहक संघटना, तालुका विज संघटना ,जिल्हा व्यापारी संघटना, तालुका व्यापारी संघटना ,नांदगाव वीज ग्राहक संघटना ,व्यापारी संघटना यांनी धडक देत या वीज समस्या बाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.

नांदगाव विज ग्राहकांचा पुढील आठवड्यात घेणार मेळावा
     या सर्व समस्या वर तोडगा काढण्यासाठी पुढील आठवड्यात वीज ग्राहकांचा नांदगाव येथे मेळावा घेण्यात यावा अशी आग्रही मागणी करण्यात आल्याने पुढील आठवड्यात वीज ग्राहकांचा मेळावा घेण्यात येईल असे आश्वासन बगाडे यांनी उपस्थित पदाधिकारी यांना दिले आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today