सिंधुदुर्ग today
अतिवृष्टी झालेल्या भागाची खासदार नारायणराव राणेंनी केली पाहणी.
पुरस्थिती ठिकाणाहून स्थलांतर केलेल्या नागरिकांची घेतली भेट.
सिंधुदुर्ग (ऋषिकेश मोरजकर)
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार काल अतिवृष्टी झाल्याने ओरोस, जिजामाता नगर येथील शेकडो नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.
आज जिजामाता नगर येथे अतिवृष्टी झालेल्या भागाची खासदार नारायणराव राणे यांनी पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
या सर्व नागरिकांची डॉन बॉस्को हायस्कूल व राजधानी हॉटेलमध्ये व्यवस्था करण्यात आलेली आहे. या नागरिकांची भेट घेऊन त्यांच्यासोबत प्रशासन आहे, हा विश्वास व्यक्त केला.
यावेळी माजी खासदार निलेश राणे, इतर पदाधिकारी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा