सिंधुदुर्ग today

 


साळीस्ते शाळेत शिवविचार मोहीम

मावळे आम्ही स्वराज्याचे यांचा सामाजिक उपक्रम

कणकवली /प्रतिनिधी 

मावळे आम्ही स्वराज्याचे,महाराष्ट्र राज्य..{ रजि } सिंधुदुर्ग जिल्हा मार्फत  गेले दोन वर्ष राबविण्यात येणारा सामाजिक उपक्रम म्हणजे शाळा तिथे शिवविचार  दि. 27/07/2024 जि.प.शाळा 01 साळीस्ते ता - कणकवली येथे पार पडला. या कार्यक्रमाला शाळेतील विध्यार्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला, कार्यक्रमाला छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल माहिती सांगून कार्यक्रमाची  सुरवात झाली.. मुलांना माहित नसलेला इतिहास ऐकून त्याचा मनात महाराजांविषयी  आणि इतिहासा विषयी प्रेरणा निर्माण झाली, *महाराजांचा पराक्रम, अपरिचित गडकिल्ले, महाराजचं नियोजन, युद्ध कला, गडसंवर्धन* अशा विषयांवर मुलांना मार्गदर्शन करण्यात आले.याच विषयांच्या  आधारावर मुलांसोबत प्रश्नमंजुषा  कार्यक्रम घेऊन त्यामधून अचूक उत्तर देण्याऱ्या प्रत्त्येक विद्यार्थ्याला  पेन वाटप करण्यात आले, त्यामधून  दोन क्रमांक निवडले ते पुढीलप्रमाणे:-

 *प्रथम .स्वरा रवींद्र चिके {इ. 6 वी } द्वितीय.समर्थ गोविंद सुतार {इ. 6वी }*

 या विजयी विद्यार्थना कणकवली विभागा मार्फत  मावळे आम्ही स्वराज्याचे या संघटनेच्या  वार्षिक सहलीमध्ये विनाशुल्क नेण्याचे कणकवली कमिटीने ठरवलं.

या कार्यक्रमाला मुलांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या वेळी शाळेचे मुख्याधपाक, तसेच शिक्षकवर्ग व सिंधदुर्ग उपजिल्हा प्रमुख श्री.अनिकेत तर्फे,रक्षिता सावंत, प्रतिक भाट,तेजल कुडतरकर, अनंत आचरेकर, दत्ताराम अमृते,अर्जुन जाधव इ. उपस्तित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today