सिंधुदुर्ग today
तोंडवली बोभाटे वाडी येथे भर दिवसा दरोडाचा प्रयत्न
दरोडेखोराबरोबर झटापट ; झटापटीत केले पलायन
दरोडेखोराचे आधार कार्ड झटापटीत पडले
रात्रभर ग्रामस्थांची शोध मोहीम.
नांदगाव पंचक्रोशीत खळबळ.
सिंधुदुर्ग today : ब्युरो न्यूज
कणकवली तालुक्यातील तोंडवली बोभाटेवाडी येथे काल सायंकाळी साडेसातच्या सुमारास विनोद बोभाटे यांच्या राहत्या घराच्या मागील बाजूस एक दरडोखोर घरामध्ये प्रवेश करत दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला या झटापटीत सदर दरोडेखोरचे आधार कार्ड घरातच पडले असून त्याने पलायन केले आहे. त्या आधार कार्ड वर दिनेश कुमार पैंकरा छत्तीसगड असा पत्ता आहे.
दरम्यान त्या दरोडेखोराकडून हल्ला करायला सुरुवात केली. हल्ला करायला सुरुवात करतातच विनोद बोभाटे व त्यांच्या कुटुंबीयांच्या अंगावर धावून आला .विनोद बोभाटे यांनी प्रतिकार केला या झटापटीत विनोद बोभाटे यांना दुखापत झाली आहे. या झटापटीत सदर दरोडेखोरचे आधार कार्ड घरातच पडले आहे. त्या आधार कार्ड वर दिनेश कुमार पैंकरा छत्तीसगड असा पत्ता आहे.
या घटनेनंतर सतर्क नागरिकांनी त्याची शोध मोहीम सुरू केली रात्री साडेअकरा पर्यंत त्याची शोध मोहीम राबविण्यात आली. तोंडवली बोबाटेवाडी नंतर त्याने नांदगाव वाशिन वाडी या ठिकाणी पलायन केल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत त्यानंतर नांदगाव वाशिन वाडी येथेही त्याचा शोध उशिरापर्यंत घेण्यात आला परंतु तो सापडू शकला नाही .
तोंडवली येथील एका वाडीतील त्याने बंद राहते घर फोडून त्या ठिकाणी दिवसभर वास्तव्य केल्याची चर्चाही ग्रामस्थांमधून केली जात आहे.
दिवसाढवळ्या या प्रकारामुळे तोंडवली परिसरात तसेच नांदगाव परिसरात खळबळ उडाली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा