सिंधुदुर्ग today



नांदगाव येथे हायवे लगत असलेल्या घरात शिरले पाणी 

चुकीच्या पद्धतीने हायवेच्या  कामाचा परिणाम - नागेश मोरये 

नांदगाव  :  (ऋषिकेश मोरजकर)

कणकवली तालुक्यातील नांदगाव बिडयेवाडी, मोरयेवाडी येथे महामार्गालगत असणा-या मोरीच्या चुकीच्या कामामुळे येथील परिसरात व घराच्या अंगणात पाणी भरले.दरम्यान याबाबत वारंवार हायवे प्राधिकरण व ठेकेदार कंपनीला सांगूनही येथील समस्या सुटत नसल्याने जोरदार पाऊस पडल्यावर याचा परिणाम पाऊसात जाणवत असल्याने येथील समीकरण समस्या कायमस्वरूपी सोपवण्यात यावी अशी मागणी माजी जि.प. सभापती नागेश मोरये यांनी केली आहे.

       गेल्या सतत दोन ते तीन वर्षापासून येथील हायवे लगत असलेल्या घरांना पाण्याचा वेढा होत आहे त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने काम झाल्याने ही समस्या उद्भवत असल्याचे नागेश मोरये यांनी सांगितले आहे. गेल्या वर्षी या उद्भवलेल्या स्थितीमुळे या ठिकाणी संतप्त झालेल्या नागरिकांनी काही काळ महामार्ग रोखला होता. परंतु कोणत्याही परिस्थितीत हायवे प्राधिकरण तसेच केसीसी कंपनी यांना सदर समस्या सोडविण्यासाठी पावसा अगोदर त्याची जाणीव होत नाही त्यामुळे सदर समस्या निर्माण होत असल्याचा आरोपही नागेश मोरये यांनी केला आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today