सिंधुदुर्ग to today



असलदे शिवाजीनगर येथे आंब्याचे झाड महामार्गावर कोसळले 

एक तासाने हटविले महामार्गावरील झाड 

दोन्ही साईटला वाहनांच्या रांगा 

घटनास्थळी प्रांताधिकारी जगदीश कातकर यांची भेट 

कणकवली (ऋषिकेश मोरजकर)

कणकवली तालुक्यातील देवगड निपाणी महामार्ग लगत  असलदे शिवाजीनगर येथे आज सायंकाळी 6 वाजता दरम्यान वादळी वाऱ्यामुळे महामार्गावर आंब्याचे झाड एका रिक्षावर पडले आहे सुदैवाने  कुणीही प्रवासी  जखमी झाले नाहीत. दरम्यान यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या 

      उपविभागीय दंडाधिकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी जगदीश कातकर देवगड वरुन कणकवली ला येत होते. त्यांनी या घटनास्थळी थांबत घटनेची माहिती घेत उपस्थित सार्वजनिक बांधकाम विभागाला धोकादायक झाडे असतील तर तातडीने उपाययोजना करुन हटवा असे आदेश दिले आहेत.

          यावेळी कणकवली उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर , बांधकाम विभागाचे श्री.बासुतकर,असलदे सरपंच चंद्रकांत डामरे,माजी सरपंच पंढरी वायगणकर, नांदगाव सरपंच भाई मोरजकर,व्यापारी संघ अध्यक्ष पप्पी सापळे,रघुनाथ लोके महेश लोके, रोहित परब,विजय आचरेकर,गणेश तेली, उदय परब,प्रदीप हरमलकर,संतोष हडकर,किरण परब,विजय आचरेकर, श्रीराम मोरजकर,कृष्णा ,संतोष घाडी,अनिल लोके ,गोविंद लोके,श्री.वाडकर,कोतवाल मिलिंद तांबे यांच्या सह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today