सिंधुदुर्ग today



नांदगाव येथे विज ग्राहकांची बैठक संपन्न 

वारंवार विज पुरवठा खंडित होत असल्याने विज ग्राहक आक्रमक भूमिकेत 

२२ जुलै रोजी देणार लेखी निवेदन 

विज पुरवठा सुरळीतपणे करण्यास आठ दिवसांची मुदत

कणकवली /प्रतिनिधी 

कणकवली तालुक्यातील नांदगाव पंचक्रोशीतील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे . यामुळे नळपाणी पुरवठ्यावर परिणाम होत आहे. तसेच श्री गणेश चतुर्थी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे गणेश शाळेत रात्रंदिवस लगबग सुरू झाली  आहे. अशातच वारंवार विज खंडित होत असल्याने विद्युत उपकरणांना याचा विपरीत परिणाम होत आहे. तसेच भरमसाठ विज बिल याबाबत चर्चा आजच्या नांदगाव येथील विज ग्राहक संघटने च्या बैठकीत करण्यात आली आहे.

      यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर, मोरजकर ट्रस्ट चे अध्यक्ष ऋषिकेश मोरजकर,  नांदगाव व्यापारी संघटना अध्यक्ष पप्पी सापळे ,प्रदीप हरमळकर, नांदगाव तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष राजू तांबे, कमलेश पाटील,तोंडवली बावशी माजी उपसरपंच अशोक बोभाटे , आयनल माजी सरपंच बापू फाटक, तंटामुक्त समिती माजी अध्यक्ष रज्जाक बटवाले, आसिफ बटवाले, कृष्णा वायंगणकर, मंगेश परब ,गुरु साळुंके आदी बहुसंख्येने विज ग्राहक उपस्थित होते.

       यावेळी सोमवार दिनांक २२ जुलै रोजी सकाळी ठीक १०.३० वा. नांदगाव येथील विज वितरण कंपनीच्या कार्यालयात लेखी स्वरूपात निवेदन देण्याचे ठरवले आहे. तसेच निवेदन दिल्यानंतर आठ दिवसांत सुरळीतपणे विज पुरवठा न झाल्यास सोमवार दिनांक 29 जुलै रोजी तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today