सिंधुदुर्ग today



नांदगाव सरस्वती हायस्कूलचे विद्यार्थी भरवणार बुधवारी नांदगाव तिठा येथे गावठी बाजार 

नांदगाव  :  (ऋषिकेश मोरजकर)

कणकवली तालुक्यातील सरस्वती हायस्कूल नांदगाव येथे माध्यमिक प्रशालेच्या वतीने सोमवार दि २२  जुलै २०२४ ते रविवार दि.२८ जुलै २०२४  पर्यंत "राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०"च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त "केंद्रीय शिक्षण मंत्रालयामार्फत आयोजित" "शिक्षण सप्ताह" साजरा करण्यात येत आहे. या सप्ताह अंतर्गत दिनांक २४ जुलै २०२४ रोजी "कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस" साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये विक्री कौशल्य व विपणन कौशल्य (मार्केटिंग) याची ओळख करण्याकरिता सरस्वती हायस्कूल नांदगाव तर्फे "गावठी माल" खरेदी विक्री बाजाराचे आयोजन करण्यात आले आहे. 

या उपक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष श्री नागेश मोरये यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास संस्थेचे सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे नांदगाव सरपंच,असलदे सरपंच, ओटव सरपंच, तीवरे सरपंच, बेळणे सरपंच, तोंडवली-बावशी सरपंच, नांदगाव व्यापारी संघटनचे पदाधिकारी, पत्रकार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

या बाजारामध्ये सरस्वती हायस्कूल नांदगावचे विद्यार्थी विविध प्रकारच्या रानभाज्या, गावठी पीठ, कोकणी मेवा, रानमेवा, गावठी तांदूळ, गावठी अंडी, गावठी कोंबडी इत्यादी विविध प्रकारच्या मालाची विक्री करणार आहे. विद्यार्थ्यांकडून गावठी माल खरेदी करून या उपक्रमास प्रतिसाद द्यावा असे आवाहन प्रशालेच्या वतीने करण्यात येत आहे. सदर गावठी बाजार बुधवार दिनांक २४ रोजी सकाळी 9.00 ते दुपारी 12.30 पर्यंत मर्यादित ठेवण्यात आली आहे. तरी सर्व पालक वर्ग, ग्रामस्थ व ग्राहकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today