सिंधुदुर्ग today



नांदगाव तात्कालीन ग्रामविकास अधिकारी मंगेश राणे यांचा सत्कार 

नांदगाव प्रतिनिधी 

कणकवली तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायत चे तात्कालीन ग्राम विकास अधिकारी श्री मंगेश राणे यांनी नांदगाव ग्रामपंचायत येथे गेले दोन वर्ष प्रभारी म्हणून अतिरिक्त कार्यभार सांभाळला होता आता नव्याने कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी म्हणून आर.डी.सावंत यांची नियुक्ती झाल्याने तात्कालीन ग्रामविकास अधिकारी मंगेश राणे यांचा निरोप समारंभ नांदगाव ग्रामपंचायत तर्फे आयोजित करून विशेष सत्कार करण्यात आला आहे .

      यावेळी नांदगाव सरपंच रविराज मोरजकर,उपसरपंच इरफान साटविलकर,ग्रामविकास अधिकारी आर.डी.सावंत, ओटव माजी सरपंच हेमंत परुळेकर, नांदगाव ग्रामपंचायत सदस्य अंगणवाडी सेविका,आशा सेविका, कृषी अधिकारी, तंटामुक्त समिती अध्यक्ष राजू तांबे, पत्रकार ऋषिकेश मोरजकर, ग्रामपंचायत कर्मचारी आदी उपस्थित होते.

       यावेळी उपस्थित सरपंच, सदस्य, यांनी मंगेश राणे यांनी केलेल्या कामाचा आढावा घेऊन आभार मानले आहे.

       मंगेश राणे यांनी ही आपल्या मनोगतात गावाच्या विकासासाठी शुभेच्छा दिल्या आपणाकडून कोणतेही सहकार्य गरजेचे असेल तर हाक द्या हाकेला ओ देऊन तात्काळ उपलब्ध होईन अशी ग्वाही दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today