सिंधुदुर्ग today
असलदे गावात आ. नितेश राणेंच्या माध्यमातून लोखंडी बाकड्यांचे वाटप
नांदगाव - (ऋषिकेश मोरजकर)
असलदे ग्रामपंचायत मध्ये कणकवली विधानसभा मतदाराचे आ. नितेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे लोखंडी बाकडी प्राप्त झाली होती. या लोखंडी बाकड्यांचे वाडी निहाय गावात वाटपाचा शुभारंभ सरपंच चंद्रकांत डामरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी लोखंडी बाकडी उपलब्ध करुन दिल्याबद्दल आ. नितेश राणे यांचे गावातील ग्रामस्थांनी ऋण व्यक्त केले.
यावेळी पोलीस हवालदार चंद्रकांत झोरे , चेअरमन भगवान लोके , उपसरपंच सचिन परब , माजी सरपंच पंढरी वायंगणकर , ग्रामपंचायत सदस्य दयानंद हडकर , विद्या आचरेकर , विद्या डामरे , सुवर्णा दळवी, सपना डामरे, देवेंद्र लोके , वासुदेव दळवी , महेश लोके , प्रविण डगरे , बाबाजी शिंदे , रघुनाथ लोके , उदय परब,सुरेश मेस्त्री , विजय खऱात , शत्रुघ्न डामरे , महेश तावडे , प्रशांत तांबे , साहिल तांबे, ग्रामसेवक संजय तांबे, ग्रामपंचायत कर्मचारी मधुसुदन परब , सत्यवान घाडी, प्रकाश वाळके , पोस्टमन श्री. गांवकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा