सिंधुदुर्ग today



वारंवार विज पुरवठा खंडित होत असल्याने नांदगाव पंचक्रोशीतील विज ग्राहक आक्रमक  

विज पुरवठा सुरळीत न  केल्यास २९ जुलै रोजी घेराव 

कणकवली /ऋषिकेश मोरजकर 

कणकवली तालुक्यातील नांदगाव पंचक्रोशीतील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे . यामुळे नळपाणी पुरवठ्यावर परिणाम होत आहे. तसेच श्री गणेश चतुर्थी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे गणेश शाळेत रात्रंदिवस लगबग सुरू झाली  आहे. अशातच वारंवार विज खंडित होत असल्याने विद्युत उपकरणांना याचा विपरीत परिणाम होत आहे. तसेच भरमसाठ विज बिल याबाबत  नांदगाव पंचक्रोशीतील विज ग्राहकांनी आक्रमक भूमिका घेतली असून आज येथील उप अभियंता श्री पंडित यांची भेट घेत लेखी स्वरूपात निवेदन दिले आहे. जर येत्या आठ दिवसांत विद्युत पुरवठा सुरळीतपणे न झाल्यास सोमवार दिनांक २९ जुलै रोजी सकाळी १०.३० वा नांदगाव येथील कार्यालयात घेराव घातला जाणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे 

      यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर, उपसरपंच इरफान साटविलकर,असलदे माजी सरपंच पंढरी वायंगणकर,नांदगाव व्यापारी संघटना अध्यक्ष पप्पी सापळे ,प्रदीप हरमळकर, नांदगाव तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष राजू तांबे, तोंडवली बावशी माजी उपसरपंच अशोक बोभाटे , संतोष मिराशी बुवा, आयनल माजी सरपंच बापू फाटक, विठोबा कांदळकर,राजू खोत , योगेश सदडेकर, भुपेश मोरजकर , मारुती मोरये, रामा मोरये , रघुनाथ लोके, विजय आचरेकर, कमलेश पाटील, कृष्णा वायंगणकर, आदी बहुसंख्येने विज ग्राहक उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today