सिंधुदुर्ग today



वागदे ग्रामपंचायतीच्या वतीने 10 विद्यार्थ्याना मोफत MSCIT संगणक  प्रशिक्षण

कणकवली प्रतिनिधी 

   वागदे ग्रामपंचायत यांच्या वतीने 12 वी उत्तीर्ण 10 विद्यार्थ्यांना MSCIT प्रशिक्षण देण्यात आले सदर विद्यार्थ्याना ग्रामपंचायत 15 वित्त  आयोग प्रशिक्षण कार्यक्रमा अंतर्गत प्रती विदयार्थी 3500 व युवा कौशल्य विकास संस्था वागदे यांच्या वतीने प्रती विदयार्थी 1000 असे 4500 प्रती विदयार्थी प्रशिक्षण फी देऊन विद्यार्थ्याना मोफत प्रशिक्षण देण्यात आले. 

 प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्याना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. यावेळी वागदे गावचे सरपंच श्री संदीप रमाकांत सावंत. ग्रामसेवक श्री युवराज बोराडे, श्री लक्ष्मण घाडीगावकर श्री उमेश घाडीगावकर सौ सुषमा विरेन गायकवाड युवा कौशल्य विकास संस्थेचे खजिनदार श्री रवींद्र सुर्यकांत गावडे व ग्रामस्थ उपस्थित होते.

या प्रसंगी MSCIT कोर्स मोफत उपलब्ध करून दिल्या बद्दल विद्यार्थ्यानी सरपंच श्री संदीप सावंत , युवा कौशल्य प्रशिक्षण संस्था व टॅलेक्स कॉम्प्युटर कणकवली यांचे आभार मानले .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today