सिंधुदुर्ग today
तोंडवली बोभाटे वाडी येथील त्या घटनेतील व्यक्ती सापडली
मानसिक स्थिती योग्य नसल्याचे निष्पन्न ; परिसरातील नागरिकांनी सोडला सुटकेचा निःश्वास
स्थानिक ग्रामस्थ व पोलीस पाटील यांनी दिले पोलीसांच्या ताब्यात
नातेवाईकांशी झाला संपर्क.
कणकवली ऋषिकेश मोरजकर
कणकवली तालुक्यातील तोंडवली बोभाटे वाडी येथील त्या घटनेतील व्यक्ती सापडली असून मानसिक स्थिती योग्य नसल्याचे निष्पन्न झाले आहे.स्थानिक ग्रामस्थ व पोलीस पाटील यांनी सदर व्यक्तीला पोलीसांच्या ताब्यात दिले आहे. दरम्यान त्याच्या छत्तीसगड मधील नातेवाईकांशी झाला संपर्क झाला असून नातेवाईक नागपूर पर्यंत आले असल्याचे समजले आहे.
या प्रकारामुळे तोंडवली व नांदगाव परिसर नव्हे तर तालुक्यात खळबळ उडाली होती मात्र आता नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
काल सायंकाळी साडेसातच्या सुमारास विनोद बोभाटे यांच्या राहत्या घराच्या मागील बाजूस एक व्यक्ती घरामध्ये प्रवेश करत हल्ला करायला सुरुवात केली.
या झटापटीत सदर व्यक्तीचे आधार कार्ड घरातच पडले होते . त्यानंतर त्याने पलायन केले होते.या प्रकारामुळे तोंडवली व नांदगाव परिसर नव्हे तर तालुक्यात खळबळ उडाली होती.
मात्र आज सायंकाळी 3.30 च्या सुमारास तोंडवली बोभाटेवाडी येथील एक ग्रामस्थ गुरे चरण्यासाठी घेऊन गेले असता त्यांना सदर व्यक्ती अंगात कपडे नसलेले असा निदर्शनास आला लगेच यांनी सदर गावातील पोलीस पाटील विजय मोरये व ग्रामस्थांना दिली. ग्रामस्थ ही लगेचच त्या ठिकाणी आले असता सदर व्यक्ती सापडली असून या व्यक्तीला घेऊन तोंडवली गावात आले व पोलीसांना याबाबत माहिती दिली व त्यांच्या ताब्यात दिले आणि दोन दिवस पोटात अन्न नसल्याने येथील ग्रामस्थांनी त्याला जेवण व कपडे ही दिले .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा