सिंधुदुर्ग today
नांदगाव ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी म्हणून आर.डी.सावंत कायमस्वरूपी रुजू
सरपंच भाई मोरजकर यांनी गैरसोय बाबत आमदार नितेश राणेंजवळ मांडली होती कैफियत.
ग्रामस्थांनी व्यक्त केले समाधान
नांदगाव ( ऋषिकेश मोरजकर)
कणकवली तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायत येथे आज कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी म्हणून आर.डी.सावंत रुजू झाले आहेत. गेली कित्येक वर्षे अतिरिक्त चार्ज कोळोशी येथील मंगेश राणे यांच्या जवळ होता.
दोन वर्ष ग्राम विकास अधिकारी या पदावरती नियमित ग्रामविकास अधिकारी नसल्याने ग्रामपंचायत नांदगाव चे कामकाज करताना खूप अडचणी येत होत्या याबाबत प्रशासनाकडे नांदगाव सरपंच रविराज मोरजकर यांनी वारंवार पाठपुरावा करून सुद्धा कर्मचारी कमी असल्याचे कारण सांगून नवीन कर्मचारी देण्यास टाळाटाळ होत होती. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना याबाबत कळवून ही कर्मचारी कमी असल्याचे कारणे ऐकावयास मिळत होते . दरम्यान हा विषय या विभागाचे आमदार नितेश राणे यांच्याकडे सदर कैफियत मांडल्यानंतर आमदार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी ओरस यांच्याशी बातचीत करून ताबडतोब नवीन ग्रामविकास अधिकारी यांची नियुक्ती नांदगाव ग्रामपंचायत मध्ये करावी असा आदेश दिला होता . आणि त्या आदेशाच्या अनुषंगाने आज दिनांक 22 जुलै 2024 रोजी श्री आर डी सावंत यांची ग्रामविकास अधिकारी म्हणून ग्रामपंचायत नांदगाव मध्ये नियुक्ती झालेली आहे . याबाबत नांदगाव गावातील ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत असून आमदार नितेश राणे यांचे आभार मानले आहे. आज त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी सरपंच भाई मोरजकर, उपसरपंच इरफान साटविलकर, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष राजू तांबे आदी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा