सिंधुदुर्ग today



कासार्डे पोलीस दूर क्षेत्राला पाण्याचा वेढा 

कणकवली (ऋषिकेश मोरजकर)

कोकणात सर्वत्र आज पावसाने झोडपले असून आज  सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झालेली असल्याने कणकवली तालुक्यातील कासार्डे पोलीस दुरक्षेत्राला पाण्याचा वेढा आला आहे. 

       कणकवली तालुक्यात ही जोरदारपणे पावसाची बॅटिंग सुरू आहे . मुंबई गोवा महामार्गावर कासार्डे येथे असलेले पोलीस दूरक्षेत्रालाही या मुसळधार पावसाचा फटका बसला असून पूर्ण दूरक्षेत्राला पाण्याचा वेढा आला आहे . मुंबई गोवा महामार्गाचे काम केल्यानंतर बऱ्याच ठिकाणी दरवर्षी पाण्याचा विळखा पहायला मिळत आहे. यावर तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today