सिंधुदुर्ग today


तिवरे येथून बेपत्ता झालेला १० वर्षीय मुलगा बेळणे येथे फिरत असताना आढळला.

सरपंच, पोलिस पाटील व ग्रामस्थांनी सुखरूप दिले आई वडिलांच्या ताब्यात. 

आई वडिलांनी मानले मनोमन आभार 

नांदगाव (ऋषिकेश मोरजकर)

आज  २० जुलै २०२४ सकाळपासून कणकवली तालुक्यातील तिवरे गावातील बेपत्ता झालेला मुलगा  कु.मुन्ना सखाराम पाटील वय १० वर्ष इयत्ता ३ री हा  लगतच असलेल्या बेळणे येथे मुंबई - गोवा महामार्गावर फिरत असताना आढळून आला.

      आई रागावल्याने मी घर सोडले असं तो मुलगा सांगत होता.दरम्यान सतर्क असलेल्या बेळणे सरपंच अविनाश गिरकर, गावचे पोलिस पाटील राजेंद्र चाळके, चंद्रकांत मुणगेकर, राजू चाळके, अजय चाळके, विशाल लाड आदी ग्रामस्थांनी त्याला त्याच्या आई वडीलांकडे सुखरूप घरी नेऊन सोडले आहे.यामुळे सरपंच,पोलिस पाटील आणि ग्रामस्थांचे मुलाच्या आई - वडिलांनी मनोमन आभार मानले आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today