सिंधुदुर्ग today
नांदगाव सरस्वती हायस्कूल च्या विद्यार्थ्यांनी भरवला गावठी बाजार
गावठी बाजाराला उस्फुर्त प्रतिसाद
कणकवली ऋषिकेश मोरजकर
कणकवली तालुक्यातील सरस्वती हायस्कूल नांदगाव येथे माध्यमिक प्रशालेच्या वतीने सोमवार दि २२ जुलै २०२४ ते रविवार दि.२८ जुलै २०२४ पर्यंत "राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०"च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त "केंद्रीय शिक्षण मंत्रालयामार्फत आयोजित" "शिक्षण सप्ताह" साजरा करण्यात येत आहे. या सप्ताह अंतर्गत आज बुधवार दिनांक २४ जुलै २०२४ रोजी "कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस" साजरा करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये विक्री कौशल्य व विपणन कौशल्य (मार्केटिंग) याची ओळख करण्याकरिता सरस्वती हायस्कूल नांदगाव तर्फे "गावठी माल" खरेदी विक्री बाजाराचे आयोजन करण्यात आले होते.याला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे.
या गावठी बाजाराचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष श्री नागेश मोरये यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमास संस्थेचे सर्व पदाधिकारी बाळू म्हसकर , सुभाष बिडये, सुनिल आंबेरकर त्याचप्रमाणे नांदगाव सरपंच भाई मोरजकर, असलदे माजी सरपंच पंढरी वायंगणकर ओटव सरपंच रुहीता तांबे , नांदगाव व्यापारी संघटनचे अध्यक्ष पप्पी सापळे व पदाधिकारी, दाजी मोरये, मारुती मोरये , मुख्याध्यापक सुधीर तांबे,आदी मान्यवर तसेच शिक्षक वृंद, पालक उपस्थित होते.
या बाजारामध्ये सरस्वती हायस्कूल नांदगावचे विद्यार्थी विविध प्रकारच्या रानभाज्या, गावठी पीठ, कोकणी मेवा, रानमेवा, गावठी तांदूळ, गावठी अंडी, गावठी कोंबडी इत्यादी विविध प्रकारच्या मालाची विक्री केली जात आहे .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा