पोस्ट्स

ऑगस्ट, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सिंधुदुर्ग Today

इमेज
नांदगाव महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्षपदी महेश उर्फ राजू तांबे नांदगाव प्रतिनिधी कणकवली तालुक्यातील नांदगाव महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्षपदी महेश उर्फ राजू तांबे यांची निवड मतदान प्रक्रियेतून झाली आहे.        या तंटामुक्त समिती साठी दोन उमेदवार इच्छूक असल्याने शेवटी हात वर करून मतदान पद्धतीने निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.यात महेश उर्फ राजू तांबे भरघोस मतांनी विजयी झाले आहेत.       नांदगाव ग्रामपंचायत ची तहकूब ग्रामसभा आज सरपंच रविराज मोरजकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली .      यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली . यामध्ये गावातील अनधिकृत धंदे बंद करण्यावरून शेवटी सर्वच दारु बंद करण्यासाठी आजच्या ग्रामसभेत ठराव कमलेश पाटील यांनी मांडला. यावर ग्रामविकास अधिकारी मंगेश राणे यांनी तसा ठराव आज घेता येणार नसून पहिल्यांदा दारुबंदी साठी विशेष ग्रामसभा घ्यावी लागेल असे नमूद केल्याने तसा ठराव घेण्यात आला असून.विशेष ग्रामसभा घेतली जाणार आहे.         यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर,उपसरपंच इरफान साटविलकर, ग्रामवि...

सिंधुदुर्ग Today न्यूज

इमेज
  . .. त्या प्रकरणाचा रज्जाक बटवाले यांनी केला निषेध कडक कारवाई करण्याची मागणी  नांदगाव प्रतिनिधी  पाकिस्तान हा देश आमचा शत्रू आहे. जर कुणाला पाकिस्तान चे गोडवे गायचे आहे व त्याचा स्वातंत्र्य दिन साजरा करायचा असेल  त्यांनी आपलं सर्व काही ते उचलायच व आपलं नाव आमच्या देशातून काढून तिथेच कायमचं राहायला जायच अशा लोकांनी येथे राहू नये   आशा लोकांमुळे संपूर्ण समाज बदनाम होतो .तेव्हा पोलिस खात्याने ताबडतोब चोकोशी करून संबंधित व्यक्ती वर कडक कारवाई करावी असे नांदगाव येथील सामाजिक कार्यकर्ते रज्जाक बटवाले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात सर्वधर्मसमभाव सलोख्याचे मिळून एकत्र वागत आहेत . हिन्दु -- मुस्लिम एकतेचे अनेक उदाहरणे आहेत .तेव्हा ज्यांनी हि अशी घटना केली आहे त्याचा आम्ही निषेध करतो व त्यांचा वर कडक कारवाई करावी व अश्या घटना पुन्हा घडू नये व समाजात जे कोणी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल त्याच्यावर कडक कारवाई करावी व कणकवली तालुक्यात सर्वधर्मसमभाव सलोख्याचे वातावरण चांगले आहे व सर्व एकत्र मिळून अनेक सण उत्साहात साजर...

सिंधुदुर्ग Today न्यूज

इमेज
नांदगाव हायवेच्या विविध  समस्यांबाबत आमदार नितेश राणे यांची पाहणी अधिकाऱ्यांना त्वरित कार्यवाही करीता केल्या सूचना. नांदगाव ऋषिकेश मोरजकर  कणकवली तालुक्यातील नांदगाव मुंबई गोवा महामार्गालगत व नांदगाव तिठा येथून जात असलेल्या देवगड निपाणी राज्य महामार्ग लगत अनधिकृत बांधकामे ती ही कुठल्याही प्रकारे कोणालाही त्रास न होता हद्द निश्चित करण्यात यावी जेणेकरून बाजारात व येणाऱ्या गणेश उत्सव वेळी वाहनांना अडथळा निर्माण होणार नाही याबाबत खबरदारी घ्यावी व लवकरच कार्यवाही करण्यात यावी अशी सुचना आमदार नितेश राणे यांनी नांदगाव तिठा येथे समस्यांबाबत पाहणी करताना उपस्थित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत.        या विविध समस्यांबाबत नांदगाव सरपंच रविराज मोरजकर यांनी सार्वजनिक बांधकाम चे कार्यकारी अभियंता यांच्याजवळ निवेदन सादर केले होते. नांदगाव हायवे ते फोंडाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा गटारे बांधून मिळवीत जेणेकरून पावसाच्या पाण्याची होणारी समस्या दूर होईल , देवगड निपाणी हायवे वरती देवगडच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर स्पीड ब्रेकर बसविणे, फोंड...

सिंधुदुर्ग Today न्यूज

इमेज
मराठा- कुणबी समाजातील १८ वर्षांवरील सर्वांसाठी मोफत संगणक शिक्षण तळेरे : वार्ताहर मराठा, कुणबी समाजासाठी शासनाच्या सारथी विभागाकडून राबविण्यात येणा-या विविध योजनांपैकी सी.एस.एम.एस डी.ई.ई.पी. डिप्लोमा संदर्भात ग्रामपंचायत ओझरमच्या ग्रामसभेत लाभार्थी कु.दत्तराज प्रमोद राणे यांनी महिती दिली, मराठा-कुणबी समाजाच्या नागरीकांनी रोजगार, स्वयंरोजगार, उद्योजकता यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण घेत  क्षमता निर्माण करणे, विद्यार्थी, विद्वान, उद्योजक, शेतकरी आणि महिलांसाठी मार्गदर्शन आणि समुपदेशन केंद्र स्थापन करणे, संस्थाआणि विविध शिष्यवृत्ती,स्टायपेंड अनुदान राबवणे हा या संस्थेचा उद्देश असून या उपक्रमाची स्थापना महाराष्ट्र राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षणाच्या पुढाकाराने महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एम.के.सी.एल) सोबत १९५६च्या तरतुदी अंतर्गत करण्यात आली आहे. या योजनेचा मराठा-कुणबी समाजातील बहुसंख्य तरूणांनी सतर्क राहून लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले. वय वर्ष १८ ते  ४५ च्या आतील स्त्री-पुरुषांनी किमान 10 वी उत्तीर्ण या पात्रतेसह जवळच्या अधिकृत अध्ययन केंद्राशी संपर्क साधून पुढील कार्...

सिंधुदुर्ग today

इमेज
  नांदगाव ग्रामपंचायत आरोग्य हेल्थ आभा कार्ड कॅम्पंला उत्स्फूर्त प्रतिसाद. नांदगाव | प्रतिनिधी नांदगाव ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र नांदगाव यांच्या वतीने नांदगाव ग्रामपंचायत येथे आज सकाळी 9.30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत (आरोग्य हेल्थ) आभा कार्ड नोंदणी कॅम्प आयोजित करण्यात आला होता .हेल्थ आभा कार्ड कॅम्पंलाया उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. प्रत्येक विभागातील ग्रामस्थांना सोयीचे होण्यासाठी प्रत्येक ठिकाणी कॅम्प घेतला जाणार असल्याचे सरपंच भाई मोरजकर यांनी सांगितले आहे. आज  ग्रामपंचायत येथे खालची मुस्लिमवाडी ,मधली वाडी, वाघाची वाडी,पाटवणेवाडी, गोसावी वाडी ,कुंभार वाडी येथील लाभार्थी यांनी येथे या आभा कार्ड साठी नोंदणी केली आहे.          यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर,उपसरपंच इरफान साटविलकर, माजी सरपंच विष्णू गुरव ,वैद्यकीय अधिकारी डॉ दत्ता तपसे, ऋषिकेश मोरजकर आरोग्य सेविका मुसळे,आरोग्य केंद्र ऑपरेटर सलिका साटविलकर ,आशा सेविका सुमती मोरजकर आदी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग today

इमेज
  फुगडी,उखणी आणि गाणी, बावशीत रंगणार श्रावण रंग  ऍड. प्राजक्ता शिंदे,ऍड.मेघना  सावंत यांचेही मार्गदर्शन बावशी सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक प्रतिष्ठानतर्फे आयोजन कणकवली/ऋषिकेश मोरजकर         बावशी सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक प्रतिष्ठानतर्फे रविवार 10 सप्टेंबर रोजी दु. ३ वा. बावशी गावठाण गणेश मंदिराच्या सभागृहात महिलांसाठी "श्रावण रंग" या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.     हा कार्यक्रम महिलांना आणि विद्यार्थांना प्रबोधनपर मार्गदर्शन आणि मनोरंजन अशा स्वरूपाचा ठेवण्यात आला आहे. यात ऍड. प्राजक्ता शिंदे यांचे "आत्मविश्वास आणि महिलांचा व्यक्तिमत्व विकास" या विषयावर तर ऍड. मेघना सावंत यांचे "कायदा आणि महिलांचे हक्क" या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. त्याचबरोबर सर्व स्तरातील महिलांसाठी "फुगडी, उखाणे आणि गाणी" या मनोरंजनाच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सर्व महिलांसाठी खुला असून या कार्यक्रमात कोणत्याही महिला सहभागी होऊ शकतात.कार्यक्रमाचे संयोजन बावशी सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक प्रतिष्ठानच्या पदाधि...

सिंधुदुर्ग today

इमेज
तोंडवली येथे कृषी कन्यांनी दाखविले शेततळ्याचे  प्रात्यक्षिक. नांदगाव प्रतिनिधी  कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषी उद्योजकता जागरूकता विकास योजनेअंतर्गत तोंडवली गावात विविध प्रात्यक्षिकांचे आयोजन केले . त्यापैकी एक म्हणजे शेततळ्याचे प्रात्यक्षिक होय .     प्रामुख्याने कोकणातील शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते . रब्बी हंगामात उद्भवणारी पाण्याची टंचाई ओळखून कृषी कंन्यांनी शेतकऱ्यांना शेततळ्यांचे प्रात्यक्षिक दाखवून त्याचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून दिले. तोंडवली  ग्रामस्थांनी या प्रात्यक्षिकात उत्स्फूर्त असा प्रतिसाद  दिला .      यामध्ये कृषी कन्या स्नेहल पाटील ,प्रगती पाटील, वैष्णवी शेटे ,कीर्ती पाटील ,सानिका कांबळे ,वैष्णवी पाटील, अंजली पाटील ,पियुषा मांजरेकर यांनी श्रमदान केले . यांना कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. संते सर,  श्री शिर्के सर,  सुखवे मॅडम , पाटणकर मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

सिंधुदुर्ग Today न्यूज

इमेज
  नांदगाव येथे विजेच्या  स्पर्शाने  वानराचा मृत्यू. नांदगाव |प्रतिनिधी नांदगाव येथे विजेच्या स्पर्शाने आज दुपारी वानराचा मृत्यू विद्युत  च्या तारेवरच झाला .सदर घटनेची माहिती मिळताच  फोंडाघाट येथील वनविभागाने नांदगाव येथील निसर्ग प्रेमींच्या मदतीने मृत वानराला खाली उतरून वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. यावेळी फोंडाघाट वनविभागाचे  श्री.केळकर, अतुल खोत निसर्ग प्रेमी बंटी पाटील,मंदार राणे , विठ्ठल बिडये, तसेच नांदगाव सरपंच भाई मोरजकर, असलदे माजी सरपंच पंढरी वायंगणकर सदर घटनास्थळी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग Today न्यूज

इमेज
नवनिर्वाचित जिल्हाधिकारी किशोर तावडे यांचे सिंधुदुर्ग पोलीस पाटील संघटना कडून स्वागत ‌. सिंधुदुर्ग Today न्यूज नवनिर्वाचित जिल्हाधिकारी किशोर तावडे यांचे कणकवली पोलीस पाटील संघटना कडून नुकतेच स्वागत करण्यात आले आहे . ‌         यावेळी कणकवली तालुका पोलीस पाटील संघ अध्यक्ष उदय सावंत ,उपाध्यक्ष नारायण गावकर, सचिव विश्वास सावंत, खजिनदार संजय  गोरुले ,जिल्हा संघटना सचिव हेमंत सावंत ,वारंग आदी पोलिस पाटील यांची जिल्हाधिकारी यांच्याशी विविध विषयांवर चर्चा झाली आहे.

सिंधुदुर्ग Today न्यूज

इमेज
 " सेलिब्रिटींचा कोरोना काळ ; ग्रंथाचे ना. नारायणराव राणे यांनी केले कौतुक. ज्येष्ठ पत्रकार संतोष वांगणकर लिखित ग्रंथ. कवी अजय कांडर यांच्या प्रभा प्रकाशनातर्फे प्रकाशित. कणकवली/ऋषिकेश मोरजकर     कोरोनाने उच्च-निच्च स्तरच संपवून टाकला आणि दुःख सगळ्यांना सम पातळीवर आणते याची अनुभूती दिली. दैनिक प्रहारचे निवासी संपादक संतोष वायंगणकर लिखित आणि कवी अजय कांडर संचलित प्रभा प्रकाशन प्रकाशित ' सेलिब्रिटींचा कोरोना काळ" हे पुस्तकही याचीच प्रचिती देणारे.हे पुस्तक  दैनिक प्रहारचे  संपादकीय सल्लागार  केन्द्रीय मंत्री ना . नारायणराव राणे  यांना श्री वायंगणकर यांनी भेट दिले. तेव्हा ना. राणे साहेबांनी या पुस्तकाचे  हसत हसत स्वागत केले व कौतुकही केले! यावेळी श्री वायंगणकर यांना पुढील लेखनासाठी त्यांनी शुभेच्छाही दिल्या.

सिंधुदुर्ग Today न्यूज

इमेज
  हायवेचे मिडल कट बंद करा अन्यथा त्याच ठिकाणी वृक्षारोपण करणार  : - अनिकेत तर्फे   मनविसे सिंधुदुर्ग उपजिल्हाअध्यक्ष यांचा इशारा   कणकवली|प्रतिनिधी हायवेचे मिडल कट ३० ऑगस्ट पर्यंत बंद करा अन्यथा  1 सप्टेंबर रोजी त्याच ठिकाणी अधिकाऱ्यांच्या हस्तेच वृक्षारोपण करणार  असल्याचे मनविसे सिंधुदुर्ग उपजिल्हा  अध्यक्ष अनिकेत तर्फे यांनी के.सी.सी .कंपनीला निवेदनाद्वारे दिला आहे.         मुंबई गोवा हायवेच्या ठेकेदार कार्यालय खारेपाटण पासून कणकवली पर्यंत हायवे मधले मिडल कट बंद न केल्याने आज पर्यंत 17 अपघात व 3 जणांचा नाहक बळी गेले असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

सिंधुदुर्ग Today न्यूज

इमेज
  नांदगाव येथे नागपंचमीच्या दिवशी अवतरला नागराज  नांदगाव |प्रतिनिधी नांदगाव येथील श्यामसुंदर तांबे यांच्या निवासस्थानी आज नागपंचमीच्याच दिवशी नागराज  अवतरला .   नांदगाव येथील सर्पमित्र असलेले  सुदेश पाटील, विठ्ठल   बिडये, रिध्देश तेली , मंगेश पाटील या सर्पमित्र यांनी निसर्गाच्या सानिध्यात नेऊन सोडून त्या कोब्राला जीवदान दिले आहे.         कोणाच्याही परिसरात असे साप आढळून आल्यास आमच्या पर्यंत संपर्क साधावा आणि सापांना वाचवा असा संदेश या सर्पमित्र यांनी यानिमित्त सर्वांना दिलेला आहे.

सिंधुदुर्ग Today

इमेज
           उद्याच्या पिढीला आपण योग्य शिक्षण दिले नाही तर ती आपल्याला माफ करणार नाही बावशी शिक्षक गौरव कार्यक्रमात कवी मधुकर मातोंडकर यांचे स्पष्ट प्रतिपादन बावशी सामाजिक प्रतिष्ठानतर्फे शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा भव्य गौरव सोहळा, विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती ऋषिकेश मोरजकर|कणकवली        उद्याच्या पिढीला आपण योग्य शिक्षण दिलं नाही तर ती आपल्याला माफ करणार नाही.त्यामुळे मोलमजुरी करणाऱ्या ग्रामीण भागातील वर्गानेही आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे. आणि शिक्षकांनी अशा मुलांची गुणवत्ता वाढीस लागेल यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. या पार्श्वभूमीवर बावशी येथे आयोजित करण्यात आलेला हा शिक्षक गौरव सोहळा प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यकर्ते कवी मधुकर मातोंडकर यांनी बावशी येथे केले.     बावशी सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक प्रतिष्ठानतर्फे कवी मातोंडकर यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक गौरव सोहळा आयोजित करण्यात आला. ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभलेल्या या कार्यक्रमात बोलताना...

सिंधुदुर्ग Today न्यूज

इमेज
  स्वातंत्र्यदिनानिमित्त तोंडवली येथे कृषी कन्यांनी केले विविध कार्यक्रम नांदगाव प्रतिनिधी        कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय येथील कृषी कन्यांनी ग्रामीण कृषी उद्योजकता जागरूकता विकास योजना 20 23 -24 अंतर्गत तोंडवली येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते.      यामध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृण धान्य वर्ष 2023 याबद्दल जागरूकता निर्माण केली तृणधान्याचे प्रतीक म्हणून त्यांनी राजगिऱ्याच्या लाडूचे वाटप केले .भारताला           विकसनशील कडून विकसित राष्ट्र घडविण्यासाठी मेरी मिट्टी मेरा देश या योजनेअंतर्गत प्रतिज्ञा घेऊन शेतकऱ्यांना मातीच्या आरोग्याचे महत्त्व पटवून दिले.      शालेय विद्यार्थ्यांमध्ये कृषी विषयक आपुलकी निर्माण करण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच गावामध्ये कृषी दिंडी काढण्यात आली .त्याचप्रमाणे शाळा व ग्रामपंचायतीचे कृषी कन्याने वृक्षारोपण केले.       यावेळी तोंडवली बावशी गृप ग्रामपंचायतीचे सरपंच सौ.मनाली गुरव,माजी उपसरपंच ...

सिंधुदुर्ग Today

इमेज
  पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती सिंधुदुर्ग जिल्हा निमंत्रकपदी लक्ष्मीकांत भावे  समन्वयक पदाची जबाबदारी कुडाळचे पत्रकार गुरूप्रसाद वामन दळवी   ऋषिकेश मोरजकर | कणकवली  पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती सिंधुदुर्ग जिल्हा निमंत्रक म्हणून कणकवलीचे पत्रकार लक्ष्मीकांत मनोहर भावे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.. समन्वयक पदाची जबाबदारी कुडाळचे पत्रकार गुरूप्रसाद वामन दळवी यांच्याकडे सोपविण्यात आली असल्याची माहिती राज्य निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी दिली. राज्यात पत्रकारांवर हल्ल्याचे प्रमाण वाढले असून  हल्ल्याबाबत कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठी पत्रकार परिषदेचे राज्य निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी केल्या आहेत.ही नियुक्ती पुढील दोन वर्षांसाठी आहे.  पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती सिंधुदुर्ग जिल्हा निमंत्रक म्हणून कणकवलीचे पत्रकार लक्ष्मीकांत मनोहर भावे यांची नियुक्ती करण्यात आली असून लक्ष्मीकांत भावे हे गेली 25 वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पत्रकारिता करीत आहेत कणकवली तालुका ...

सिंधुदुर्ग Today न्यूज

इमेज
बावशी सामाजिक संस्थेच्या बोधचिन्हाचे उद्या अनावरण इस्लामपूर येथील चित्रकार प्रशीक पाटील यांनी महापुरुषांच्या प्रतिमेने साकारले अर्थपूर्ण बोधचिन्ह  कणकवली/प्रतिनिधी      बावशी सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक प्रतिष्ठान या संस्थेचे सांगली इस्लामपूर येथील प्रतिभावंत तरुण चित्रकार प्रशीक पाटील यांनी महापुरुषांच्या प्रतिमेचे अर्थपूर्ण बोधचिन्ह साकारले आहे. त्याचा अनावर कार्यक्रम बावशी येथे शनिवार 19 रोजी स. ११ वा. आयोजित करण्यात आला आहे.     "विवेकाने जगू हाच आमचा ध्यास- जात धर्म ओलांडून गावचा विकास" असं बोधवाक्य बावशी सामाजिक प्रतिष्ठानचे असून या बोधवाक्याला साजेसे अर्थपूर्ण हे बोधचिन्ह चित्रकार पाटील यांनी तयार केले आहे. ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, महात्मा गांधी, छत्रपती शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांची प्रतिमा एकत्रित करून हे बोधचिन्ह तयार करण्यात आले आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार दिला. महात्मा गांधींनी शांततेचा संदेश दिला आणि छत्रपती शाहू महाराज व बाबासाहेब आंबेडकर यांनी खेडोपाड्यासह सर्व स्तरातील अस्पृश्...

सिंधुदुर्ग Today न्यूज

इमेज
  नांदगाव विद्यमान मंडळ अधिकारी विद्या जाधव यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बदली. नांदगाव वासियांतर्फे यथोचित सत्कार. गेली ५ वर्षे यशस्वी कामगिरी नुतन मंडळ अधिकारी म्हणून आत्मबोध जाधव रुजू. नांदगाव | ऋषिकेश मोरजकर कणकवली तालुक्यातील नांदगाव विद्यमान मंडळ अधिकारी सौ.विद्या जाधव यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बदली झाली असून त्यांनी सन २०१८ ते २०२३ या कालावधीत उत्कृष्ट कामगिरी बजावली असून त्यांना नांदगाव वासियांतर्फे सन्मान करण्यात आला आहे. दरम्यान नुतन मंडळ अधिकारी म्हणून आत्मबोध जाधव रुजू झाले असून त्यांना ही शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.          यावेळी शाल ,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.        यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर, उपसरपंच इरफान साटविलकर ,असलदे माजी सरपंच पंढरी वायंगणकर, रज्जाक  बटवाले, ग्रामपंचायत सदस्य अनिकेत तांबे ,जैबा नावलेकर तसेच तळेरे मंडळ अधिकारी नागावकर,नांदगाव तलाठी सुदर्शन अलकुटे तलाठी प्रवीण लुडबे ,वाघेरी तलाठी श्रीमती गोजिरी गोडे सर्व तलाठी व कोतवाल ,डाटा ऑपरेटर महम्मद बटवाले आणि कर्मचारी वृद्ध उपस...

सिंधुदुर्ग Today

इमेज
दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्गकडून प्रा .हरि नरके यांना आदरांजली! कणकवली | प्रतिनिधी दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्गकडून प्रा .हरि नरके यांना आदरांजली! कणकवली | प्रतिनिधी दिवंगत प्रा हरी नरके यांची  बहुजन समाजाला फुले शाहू आंबेडकर यांचा वैचारिक वारसा समजावून सांगणारे मराठी लेखक, अभ्यासू संशोधक, वक्ते आणि मराठी स्तंभलेखक व समता परिषदेचे सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती.त्यांच्या अकाली जाण्याने आपण एका चतुरस्त्र व परखड अभ्यासक विचारवंताला गमावून बसलो आहोत असे मत प्रा. सिध्दार्थ तांबे यांनी व्यक्त केले. नरके यांनी पुणे विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केलं .महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य होते.हरी नरके हे पुण्यातील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर उपाध्यक्ष होते. मराठी भाषा ही संस्कृत, कन्नड, तेलुगू यांप्रमाणेच एक अभिजात भारतीय भाषा आहे हे सिद्ध करण्यासाठी नेमलेल्या रंगनाथ पठारे समितीच्या अहवालात प्रमुख समन्वयक म्हणून प्रा. हरी नरके यांनी योगदान दिले होते. महात्मा फुले हा त्यांच्या अभ्यासाचा मुख्य विषय होता पण त्यासोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि मह...

सिंधुदुर्ग Today न्यूज

इमेज
विज वितरण कंपनीचा खेळ खंडोबा सुरूच लाईट जाते रातभर ; बिल येतं  हातभर सततच्या वीज पुरवठा खंडित मुळे ग्राहक हैराण आज नांदगाव विज वितरण कंपनीच्या दरवाजाला चिकटले नोटीस कणकवली | ऋषिकेश मोरजकर सध्या सर्वत्र ठिकाणी विजेचा खेळ खंडोबा सुरू आहे. सतत होणाऱ्या वारंवार वीज पुरवठा खंडित मुळे विद्युत उपकरणांवर परिणाम झालेला आहे तसेच ग्रामपंचायतच्या नळ पाणी योजना पुरवठा असतील त्याचप्रमाणे दीड महिन्यावर आलेली श्री गणेश चतुर्थी निमित्त गणपती शाळा रात्रंदिवस सुरू आहेत. अशावेळी वारंवार होणारा वीस पुरवठा खंडित मुळे वीज ग्राहक पुरता हैराण झालेला आहे.       तसेच पावसाळ्यात मच्छर मोठ्या प्रमाणात होत असते अशा वेळी रात्री लाईट गेल्यावर विज ग्राहकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.       आज सोमवारीच वीज ग्राहकांनी  वीज मंडळ नांदगाव येथील कार्यालयाला भेट दिली असता सदर विद्युत अभियंता कर्मचारी विद्युत लाईनवर काम करण्यासाठी गेले होते या वीज ग्राहकांनी बंद दरवाज्याला  वारंवार वीज पुरवठा खंडित मुळे नोटीस चिकटण्यात आले आहे.      यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर...

सिंधुदुर्ग Today न्यूज

इमेज
  नांदगाव ग्रामपंचायत च्या वतीने माजी सैनिकांचा करण्यात आला सन्मान स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत विविध उपक्रम नांदगाव / ऋषिकेश मोरजकर नांदगाव ग्रामपंचायत च्या वतीने आज आझादी का अमृत महोत्सव वर्ष निमित्त 14 ऑगस्ट या दरम्यान माजी सैनिकांचा सन्मान करण्याचा आदेश शासनाचा असल्याने याच अनुषंगाने आज नांदगाव येथील माजी सैनिकांचा सन्मान नांदगाव ग्रामपंचायत च्या वतीने वृक्ष गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत आज नांदगाव ग्रामपंचायत येथे ध्वजारोहण कार्यक्रम नांदगाव मधली वाडी येथील माजी पोलीस अधिकारी श्री सहदेव सिताराम पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी विविध मान्यवर मंडळी उपस्थित होते.       स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत माझी माती माझा देश या उपक्रमांतर्गत आज दिनांक 14 ऑगस्ट 2023 रोजी ग्रामपंचायत नांदगाव तर्फे विविध उपक्रम राबविण्यात आले  त्यामध्ये प्रथम ध्वजारोहण गावातील निवृत्त पोलीस सहदेव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर शीला फलकाचे अनावरण करण्यात आले,  गावातील माझी सैनिक सेवानिवृत्त पोलीस व त्यांचे कुटुंबीय यां...

सिंधुदुर्ग Today न्यूज

इमेज
                              मधुकर मातोंडकर बावशी सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक प्रतिष्ठानचा शिक्षक गौरव सोहळा 19 रोजी सामाजिक - सांस्कृतिक कार्यकर्ते मधुकर मातोंडकर यांची प्रमुख उपस्थिती अंगणवाडी कर्मचाऱ्यांचाही होणार गौरव कणकवली/प्रतिनिधी                 बावशी सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक प्रतिष्ठानचा शिक्षक गौरव सोहळा शनिवार 19 रोजी सकाळी ११ वा. बावशी गावठण येथे आयोजित करण्यात आला आहे.प्रसिद्ध सामाजिक - सांस्कृतिक कार्यकर्ते मधुकर मातोंडकर यांच्या प्रमुख उपस्थिती होणाऱ्या या सोहळ्यात गावातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचाही गौरव करण्याचा निर्णय प्रतिष्ठानच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष विलास कांडर आणि कार्यवाह समीर मयेकर यांनी दिली.    बावशी सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक प्रतिष्ठानची बैठक या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर बावशी येथे घेण्यात आली. यावेळी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष मोहन खडपे, कोषाध्यक्ष शिवराम गुरव, सहकार्यवाह संजय राण...

सिंधुदुर्ग Today न्यूज

इमेज
  विजयदुर्ग येथे शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे अल्पसंख्याक पदाधिकारी नियुक्ती देवगड| प्रतिनिधी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या अल्पसंख्याक आघाडी देवगड तालुक्यातील विजयदुर्ग येथे काही नियुक्ती पत्र आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष तथा सिंधुदुर्ग बॅंक माजी अध्यक्ष सतीश सावंत, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मजिद बटवाले यांच्या उपस्थितीत देण्यात आले आहे.        यावेळी यावेळी निसार शेख , तात्या निकम, संदीप डोलकर, संतोष, सचिन, युसुफ,पवार आदी उपस्थित होते.     नियुक्ती पत्रात अल्पसंख्यांक महिला तालुकाप्रमुख जोसलिन फर्नांडिस ,अल्पसंख्यांक उपतालुकाप्रमुख इकबाल धोपावकर, अल्पसंख्यांक सरचिटणीस मुराद सोलकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

सिंधुदुर्ग Today

इमेज
  नांदगाव तिठा ब्रिज वरील पाण्याचा निचरा होण्यासाठी पाईप लाईन चे काम सुरू सर्व समस्या मार्गी लावावे नंतरच ब्रिज खालील साफसफाई करावी. ... अन्यथा होणा-या परिणामांस आपण जबाबदार राहणार - सरपंच  नांदगाव  (ऋषिकेश मोरजकर) राष्ट्रीय महामार्ग ६६ बाबत २ ऑगस्ट २०२३ रोजी महामार्ग अभियंता श्री जाधव साहेब श्री शिवनिवार श्री कुमावत यांचेशी नांदगाव ग्रामपंचायत च्या माध्यमातून चर्चा करण्यात आली होती त्यांना काही सूचना करण्यात आल्या होत्या त्यामध्ये नांदगाव येथे फ्लायओव्हरब्रीज वरून पाणी जोरदार प्रवाह होवून धबधबे कोसळत आहे. त्याची व्यवस्था करण्याबाबत सूचना करण्यात आली होती. आणि त्याबाबतचं काम आज दिनांक ६ ऑगस्ट २०२३ रोजी सुरू करण्यात आले आहे. त्याबद्दल ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.   अजूनही आठ ते दहा मागण्या सरपंच ग्राम पंचायत नांदगाव आणि ग्रामस्थ यांच्या माध्यमातून सुचविण्यात आलेल्या आहेत.त्या मागण्या प्राधान्याने पूर्ण कराव्यात आणि नंतरच ब्रीज खालची साफ सफाई करावी.अन्यथा होणाऱ्या परिणामांस हायवे प्राधिकरण जबाबदार राहील.ब्रीज खालची जागा ही हायवे प्राधिकरणाचीच आहे ,परंत...

सिंधुदुर्ग Today

इमेज
  मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी संशयित आरोपी संजय रामचंद्र माने याची जामीनावर मुक्तता कणकवली/प्रतिनिधी        आपसात भांडणा दरम्यान धक्का देऊन मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी संशयित आरोपी संजय रामचंद्र माने याची ओरोस येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी जामीनावर मुक्तता केली. आरोपीच्या वतीने अँड. प्राजक्ता शिंदे यांनी काम पाहिले.              याप्रकरणी थोडक्यात हकीकत अशी कि, फिर्यादी निलेश लक्ष्मण धोत्रे, रा. कलमठ- कणकवली यांनी दिलेली फिर्याद नुसार, 21मार्च 2023 रोजी फिर्यादीचे वडील लक्ष्मण दुर्गाप्पा धोत्रे व त्यांचे सोबत ट्रॅक्टरवर मदतीला गेलेला संजय रामचंद्र माने यांच्यात कणकवली मराठा मंडळकडे जाणाऱ्या रस्त्यावर सुपर चिकन सेंटरच्या समोर ट्रॅक्टरमध्ये चिकन सेंटर मधील घाण भरण्यासाठी ट्रॅक्टर थांबलेला असताना रात्री 9.00 वा. च्या सुमारास ट्रॅक्टर चालविण्याचे कारणावरुन त्या दोघांमध्ये भांडण झाले. तेव्हा लक्ष्मण दुर्गाप्पा धोत्रे यांनी तेथेच ट्रॅक्टर ठेवून ते दोघेही रस्त्यावरून पायी चालत जात असताना संजय माने याने लक्ष्मण दुर्ग...

सिंधुदुर्ग Today

इमेज
  अण्णा भाऊ साठे यांना एका जातीत बांधू नका शिवाजी विद्यापीठातील परिसंवाद अध्यक्षपदावरून बोलताना कवी अजय कांडर यांचे परखड मत प्रा.सोमनाथ कदम, प्रा.डॉ.सुनीता बर्डे, प्रा.डॉ.प्रकाश नाईक, प्रा.निरंजन फरांदे आदी अभ्यासकांचाही सहभाग कणकवली/ऋषिकेश मोरजकर     अण्णा भाऊ साठे यांचे लेेखन जगण्याचे समग्र भान देते.मराठी साहित्यात शोषित वर्गाच्या साहित्याचा पाया रचणारा हा साहित्यिक गरिबीतही अतिशय स्वाभिमानाने जगला.म्हणूनच त्यांच्या लेखनात स्वाभिमान जपणाऱ्या लढावू व्यक्तिरेखा येतात. अशा या महान लेखकाला एका जातीत बांधू नका.जातीअंत व्हावा असे म्हणणारे लेखकही आज स्वत:च्या जातीच्या वर्तुळातच अडकलेले दिसतात. असे परखड मत शिवाजी विद्यापीठात झालेल्या परिसंवादाच्या अध्यक्षपदावरून बोलताना कवी तथा स्तंभ लेखक अजय कांडर यांनी व्यक्त केले.      कोल्हापूर शिवाजी विद्यापीठ, मराठी विभाग आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने 'अण्णा भाऊ साठे यांचे वाङमय  पुनर्शोधाच्या दिशा' या विषयावरील परिसंवाद कवी कांडर यांच्या अध्यक्षतेखाली शिवाजी विद्या...

सिंधुदुर्ग Today न्यूज

इमेज
  नांदगाव रेल्वे स्टेशनला तुतारी एक्सप्रेसचे जंगी स्वागत. आज पासून नांदगाव येथे पूर्ववत थांबा. केंद्रीय मंत्री नारायणराव राणे व आमदार नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश.  कोरोना नंतर तुतारी एक्सप्रेस थांबा नांदगाव येथे करण्यात आला होता बंद. नांदगाव ऋषिकेश मोरजकर  कणकवली तालुक्यातील नांदगाव रेल्वे स्टेशन येथे कोरोना काळात बंद केलेला तुतारी एक्सप्रेसचा थांबा आज पुन्हा पूर्ववत करण्यात आलेला आहे केंद्रीय मंत्री नारायणराव राणे तसेच आमदार नितेश राणे यांच्या केंद्रीय रेल्वेमंत्री यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर तात्काळ दखल घेत आजपासून या तुतारी एक्सप्रेसला नांदगाव येथे थांबा मिळालेला आहे त्या तुतारी एक्सप्रेसचे जंगी स्वागत करण्यासाठी बहुसंख्य भाजपा व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच प्रवासी वर्ग उपस्थितीत स्वागत करण्यात आले यावेळी  चार दिवसांपूर्वीच याबाबत केंद्रीय मंत्री नारायणराव राणे तसेच आमदार नितेश राणे यांनी केंद्रीय केंद्रीय रेल्वेमंत्री यांची भेट घेऊन याबाबत लक्ष वेधले होते केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी तात्काळ याची दखल घेत 24 तासात हा थांबा पूर्वरत केला आहे. त्यामुळे सर्व ...

सिंधुदुर्ग Today न्यूज

इमेज
  नांदगाव हायवे चौपदरीकरण संदर्भात प्रलंबित कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याबाबत सकारात्मक चर्चा प्रलंबित कामाबाबत ग्रामपंचायत मार्फत दिली होती नोटीस हायवे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा नांदगाव (ऋषिकेश मोरजकर)   मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 चौपदरीकरण अंतर्गत नांदगाव येथील प्रलंबित कामाबाबत नांदगाव ग्रामपंचायत तर्फे  मुख्य अभियंता राष्ट्रीय महामार्ग खारेपाटण विभाग यांना नोटीस देण्यात आली होती. व काही मागण्या वजा सूचना करण्यात आली होती. त्या अनुषंगाने आज दिनांक 2 ऑगस्ट 2023 रोजी  राष्ट्रीय महामार्ग विभाग अभियंता श्री जाधव साहेब श्री शिवनिवार श्री कुमावत यांनी नांदगाव हद्दीमध्ये राष्ट्रीय महामार्ग 66 बाबत नांदगाव सरपंच श्री रविराज मोरजकर तसेच इतर ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ यांच्याशी चर्चा केली आणि त्यामध्ये लता नगरी ते नांदगाव हायवेची हद्द कायम करणे, नांदगाव पाटील वाडी जवळील दत्त मंदिर जवळील रस्ता दुरुस्त करणे, नांदगाव शाळा नंबर एकच्या दुतर्फा रेलिंग उभारणे ,मनोहर बिडये घराजवळील मोरी दुरुस्त करणे, ओटव फाटा आणि नांदगाव तिठा सर्विस रोड पूर्ण करणे, ओटव फा...