सिंधुदुर्ग Today न्यूज



नांदगाव हायवेच्या विविध समस्यांबाबत आमदार नितेश राणे यांची पाहणी

अधिकाऱ्यांना त्वरित कार्यवाही करीता केल्या सूचना.

नांदगाव ऋषिकेश मोरजकर 

कणकवली तालुक्यातील नांदगाव मुंबई गोवा महामार्गालगत व नांदगाव तिठा येथून जात असलेल्या देवगड निपाणी राज्य महामार्ग लगत अनधिकृत बांधकामे ती ही कुठल्याही प्रकारे कोणालाही त्रास न होता हद्द निश्चित करण्यात यावी जेणेकरून बाजारात व येणाऱ्या गणेश उत्सव वेळी वाहनांना अडथळा निर्माण होणार नाही याबाबत खबरदारी घ्यावी व लवकरच कार्यवाही करण्यात यावी अशी सुचना आमदार नितेश राणे यांनी नांदगाव तिठा येथे समस्यांबाबत पाहणी करताना उपस्थित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

       या विविध समस्यांबाबत नांदगाव सरपंच रविराज मोरजकर यांनी सार्वजनिक बांधकाम चे कार्यकारी अभियंता यांच्याजवळ निवेदन सादर केले होते. नांदगाव हायवे ते फोंडाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा गटारे बांधून मिळवीत जेणेकरून पावसाच्या पाण्याची होणारी समस्या दूर होईल , देवगड निपाणी हायवे वरती देवगडच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर स्पीड ब्रेकर बसविणे, फोंड्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरील दोन स्पीड बेकर आहेत तिथं एक बसविणे, देवगड निपाणी रोडवरील नांदगाव तिठा परिसरातील हायवेवरील रस्त्याची हद्द निश्चित करून अतिक्रमण हटविणे, देवगड निपाणी हायवे वरील धोकादाय झाडे तोडून होणाऱ्या अपघात टाळावे अशा विविध समस्यांसाठी नांदगाव सरपंच यांनी निवेदन सादर केले होते. या अनुषंगाने आज सकाळी ११.३० च्या दरम्यान आमदार नितेश राणे यांनी नांदगाव येथे प्रत्यक्ष पाहणी केली .

   यावेळी भाजपच मंडल अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, नांदगाव सरपंच रविराज मोरजकर, रज्जाक बटवाले, माजी उपसरपंच निरज मोरये , कमलेश पाटील, गवस साठविलकर,यासिन नावलेकर, संतोष जाधव, प्रमोद पाटील, मारुती मोरये, यासीर मास्के आदी बहुसंख्येने ग्रामस्थ नागरिक उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today