सिंधुदुर्ग Today

 


नांदगाव तिठा ब्रिज वरील पाण्याचा निचरा होण्यासाठी पाईप लाईन चे काम सुरू

सर्व समस्या मार्गी लावावे नंतरच ब्रिज खालील साफसफाई करावी.

... अन्यथा होणा-या परिणामांस आपण जबाबदार राहणार - सरपंच 

नांदगाव  (ऋषिकेश मोरजकर)

राष्ट्रीय महामार्ग ६६ बाबत २ ऑगस्ट २०२३ रोजी महामार्ग अभियंता श्री जाधव साहेब श्री शिवनिवार श्री कुमावत यांचेशी नांदगाव ग्रामपंचायत च्या माध्यमातून चर्चा करण्यात आली होती त्यांना काही सूचना करण्यात आल्या होत्या त्यामध्ये नांदगाव येथे फ्लायओव्हरब्रीज वरून पाणी जोरदार प्रवाह होवून धबधबे कोसळत आहे. त्याची व्यवस्था करण्याबाबत सूचना करण्यात आली होती. आणि त्याबाबतचं काम आज दिनांक ६ ऑगस्ट २०२३ रोजी सुरू करण्यात आले आहे. त्याबद्दल ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

  अजूनही आठ ते दहा मागण्या सरपंच ग्राम पंचायत नांदगाव आणि ग्रामस्थ यांच्या माध्यमातून सुचविण्यात आलेल्या आहेत.त्या मागण्या प्राधान्याने पूर्ण कराव्यात आणि नंतरच ब्रीज खालची साफ सफाई करावी.अन्यथा होणाऱ्या परिणामांस हायवे प्राधिकरण जबाबदार राहील.ब्रीज खालची जागा ही हायवे प्राधिकरणाचीच आहे ,परंतु आपली प्रलंबित कामे तशीच ठेवायची आणि कोणीतरी बेरोजगार युवक पोट भरतो आहे, त्यांच्या पोटावर लाथ मारायची हे कदापि सहन केले जाणार नाही असा इशारा नांदगांव सरपंच श्री रविराज मोरजकर यांनी दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today