सिंधुदुर्ग Today न्यूज

 


नांदगाव विद्यमान मंडळ अधिकारी विद्या जाधव यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बदली.

नांदगाव वासियांतर्फे यथोचित सत्कार.

गेली ५ वर्षे यशस्वी कामगिरी

नुतन मंडळ अधिकारी म्हणून आत्मबोध जाधव रुजू.

नांदगाव | ऋषिकेश मोरजकर

कणकवली तालुक्यातील नांदगाव विद्यमान मंडळ अधिकारी सौ.विद्या जाधव यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बदली झाली असून त्यांनी सन २०१८ ते २०२३ या कालावधीत उत्कृष्ट कामगिरी बजावली असून त्यांना नांदगाव वासियांतर्फे सन्मान करण्यात आला आहे. दरम्यान नुतन मंडळ अधिकारी म्हणून आत्मबोध जाधव रुजू झाले असून त्यांना ही शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

         यावेळी शाल ,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.



       यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर, उपसरपंच इरफान साटविलकर ,असलदे माजी सरपंच पंढरी वायंगणकर, रज्जाक  बटवाले, ग्रामपंचायत सदस्य अनिकेत तांबे ,जैबा नावलेकर तसेच तळेरे मंडळ अधिकारी नागावकर,नांदगाव तलाठी सुदर्शन अलकुटे तलाठी प्रवीण लुडबे ,वाघेरी तलाठी श्रीमती गोजिरी गोडे सर्व तलाठी व कोतवाल ,डाटा ऑपरेटर महम्मद बटवाले आणि कर्मचारी वृद्ध उपस्थित होते.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today