सिंधुदुर्ग Today न्यूज
हायवेचे मिडल कट बंद करा अन्यथा त्याच ठिकाणी वृक्षारोपण करणार : - अनिकेत तर्फे
मनविसे सिंधुदुर्ग उपजिल्हाअध्यक्ष यांचा इशारा
कणकवली|प्रतिनिधी
हायवेचे मिडल कट ३० ऑगस्ट पर्यंत बंद करा अन्यथा 1 सप्टेंबर रोजी त्याच ठिकाणी अधिकाऱ्यांच्या हस्तेच वृक्षारोपण करणार असल्याचे मनविसे सिंधुदुर्ग उपजिल्हा अध्यक्ष अनिकेत तर्फे यांनी के.सी.सी .कंपनीला निवेदनाद्वारे दिला आहे.
मुंबई गोवा हायवेच्या ठेकेदार कार्यालय खारेपाटण पासून कणकवली पर्यंत हायवे मधले मिडल कट बंद न केल्याने आज पर्यंत 17 अपघात व 3 जणांचा नाहक बळी गेले असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा