सिंधुदुर्ग Today न्यूज
नांदगाव हायवे चौपदरीकरण संदर्भात प्रलंबित कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याबाबत सकारात्मक चर्चा
प्रलंबित कामाबाबत ग्रामपंचायत मार्फत दिली होती नोटीस
हायवे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा
नांदगाव (ऋषिकेश मोरजकर)
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 चौपदरीकरण अंतर्गत नांदगाव येथील प्रलंबित कामाबाबत नांदगाव ग्रामपंचायत तर्फे मुख्य अभियंता राष्ट्रीय महामार्ग खारेपाटण विभाग यांना नोटीस देण्यात आली होती. व काही मागण्या वजा सूचना करण्यात आली होती. त्या अनुषंगाने आज दिनांक 2 ऑगस्ट 2023 रोजी राष्ट्रीय महामार्ग विभाग अभियंता श्री जाधव साहेब श्री शिवनिवार श्री कुमावत यांनी नांदगाव हद्दीमध्ये राष्ट्रीय महामार्ग 66 बाबत नांदगाव सरपंच श्री रविराज मोरजकर तसेच इतर ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ यांच्याशी चर्चा केली आणि त्यामध्ये लता नगरी ते नांदगाव हायवेची हद्द कायम करणे, नांदगाव पाटील वाडी जवळील दत्त मंदिर जवळील रस्ता दुरुस्त करणे, नांदगाव शाळा नंबर एकच्या दुतर्फा रेलिंग उभारणे ,मनोहर बिडये घराजवळील मोरी दुरुस्त करणे, ओटव फाटा आणि नांदगाव तिठा सर्विस रोड पूर्ण करणे, ओटव फाटा ब्रिजवरील लाईट चालू करणे , आणि त्यासाठी लागणारा ट्रान्सफॉर्मर जलद गतीने बसविणे, नांदगाव ओटव फाटा येथे दोन्ही बाजूला प्रवासी निवारा शेड उभारणे, ओटव फाटा व नांदगाव तिठा येथे पावसाच्या पाण्याचे निचरा करण्याचे नियोजन करणे, नांदगाव ब्रिज खाली सुशोभीकरण विद्युत दिव्यांची सोय करणे, नांदगाव तिठा ब्रिज ते स्नेहल निवास गटार बांधणे, हायवेच्या दोन्ही बाजूवरील फुटपात वरील फिक्स केलेले खाजगी बोर्ड हटवणे, नांदगाव दत्त मंदिर येथील पावसाच्या पाण्याने गळणारी एसटी शेड दुरुस्त करणे इत्यादी अपूर्ण असलेली काम आणि आवश्यक असलेली कामे सुचविण्यात आली आहेत. याबाबत महामार्ग विभागाचे अभियंता जाधव साहेब श्री शिवनिवार श्री कुमावत यांनी सकारात्मक चर्चा केली असून ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिलेल आहे.
यावेळी नांदगाव सरपंच रविराज मोरजकर, उप सरपंच इरफान साटविलकर, सदस्य विनोद मोरये ,प्रमोद पाटील, संतोष बिडये , राजू तांबे,कमलेश पाटील, मंगेश पाटील, विठ्ठल बिडये ,भाई मोरये, सतीश साळुंखे आदी ग्रामस्थ व के सी सी चे श्री पांडे उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा