सिंधुदुर्ग Today



नांदगाव महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्षपदी महेश उर्फ राजू तांबे

नांदगाव प्रतिनिधी

कणकवली तालुक्यातील नांदगाव महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्षपदी महेश उर्फ राजू तांबे यांची निवड मतदान प्रक्रियेतून झाली आहे.

       या तंटामुक्त समिती साठी दोन उमेदवार इच्छूक असल्याने शेवटी हात वर करून मतदान पद्धतीने निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.यात महेश उर्फ राजू तांबे भरघोस मतांनी विजयी झाले आहेत.

      नांदगाव ग्रामपंचायत ची तहकूब ग्रामसभा आज सरपंच रविराज मोरजकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली .

     यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली . यामध्ये गावातील अनधिकृत धंदे बंद करण्यावरून शेवटी सर्वच दारु बंद करण्यासाठी आजच्या ग्रामसभेत ठराव कमलेश पाटील यांनी मांडला. यावर ग्रामविकास अधिकारी मंगेश राणे यांनी तसा ठराव आज घेता येणार नसून पहिल्यांदा दारुबंदी साठी विशेष ग्रामसभा घ्यावी लागेल असे नमूद केल्याने तसा ठराव घेण्यात आला असून.विशेष ग्रामसभा घेतली जाणार आहे.

        यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर,उपसरपंच इरफान साटविलकर, ग्रामविकास अधिकारी मंगेश राणे,सर्व ग्रा.पं.सदस्य तसेच गावतील प्रतिष्ठीत नागरिक ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today