सिंधुदुर्ग today
नांदगाव ग्रामपंचायत आरोग्य हेल्थ आभा कार्ड कॅम्पंला उत्स्फूर्त प्रतिसाद.
नांदगाव | प्रतिनिधी
नांदगाव ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र नांदगाव यांच्या वतीने नांदगाव ग्रामपंचायत येथे आज सकाळी 9.30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत (आरोग्य हेल्थ) आभा कार्ड नोंदणी कॅम्प आयोजित करण्यात आला होता .हेल्थ आभा कार्ड कॅम्पंलाया उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
प्रत्येक विभागातील ग्रामस्थांना सोयीचे होण्यासाठी प्रत्येक ठिकाणी कॅम्प घेतला जाणार असल्याचे सरपंच भाई मोरजकर यांनी सांगितले आहे. आज ग्रामपंचायत येथे खालची मुस्लिमवाडी ,मधली वाडी, वाघाची वाडी,पाटवणेवाडी, गोसावी वाडी ,कुंभार वाडी येथील लाभार्थी यांनी येथे या आभा कार्ड साठी नोंदणी केली आहे.
यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर,उपसरपंच इरफान साटविलकर, माजी सरपंच विष्णू गुरव ,वैद्यकीय अधिकारी डॉ दत्ता तपसे, ऋषिकेश मोरजकर आरोग्य सेविका मुसळे,आरोग्य केंद्र ऑपरेटर सलिका साटविलकर ,आशा सेविका सुमती मोरजकर आदी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा