सिंधुदुर्ग Today



दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्गकडून प्रा .हरि नरके यांना आदरांजली!

कणकवली | प्रतिनिधी

दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्गकडून प्रा .हरि नरके यांना आदरांजली!

कणकवली | प्रतिनिधी

दिवंगत प्रा हरी नरके यांची  बहुजन समाजाला फुले शाहू आंबेडकर यांचा वैचारिक वारसा समजावून सांगणारे मराठी लेखक, अभ्यासू संशोधक, वक्ते आणि मराठी स्तंभलेखक व समता परिषदेचे सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती.त्यांच्या अकाली जाण्याने आपण एका चतुरस्त्र व परखड अभ्यासक विचारवंताला गमावून बसलो आहोत असे मत प्रा. सिध्दार्थ तांबे यांनी व्यक्त केले. नरके यांनी पुणे विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केलं .महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य होते.हरी नरके हे पुण्यातील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर उपाध्यक्ष होते. मराठी भाषा ही संस्कृत, कन्नड, तेलुगू यांप्रमाणेच एक अभिजात भारतीय भाषा आहे हे सिद्ध करण्यासाठी नेमलेल्या रंगनाथ पठारे समितीच्या अहवालात प्रमुख समन्वयक म्हणून प्रा. हरी नरके यांनी योगदान दिले होते. महात्मा फुले हा त्यांच्या अभ्यासाचा मुख्य विषय होता पण त्यासोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्रातल्या सामाजिक चळवळी हा ही त्यांचा अभ्यासाचा विषय राहिलेला आहे. महात्मा फुलेंच्या समग्र साहित्य सोबतच त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची फोटो बायोग्राफी सुद्धा संपादित केली असल्याचे सन्मा.राजेश कदम यांनी सांगितले.

“हरी नरके यांनी बाबासाहेब आंबेडकरांची फोटोग्राफी प्रसिद्ध केली. त्यांनी छान पुस्तकं तयार केली. महात्मा फुले यांच मूळ चित्र शोधून काढलं, आमच्या प्रत्येक कार्यक्रमात, हरी नरके आमचा वैचारिक पाठिंबा होता. अलीकडे आरक्षणाच्या बाबतीत ते माहिती पुरवायचे. समता चळवळीचे आघाडीचे शिलेदार,ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक श्री.हरी नरके यांचे दुर्दैवी निधन झाल्याची बातमी अत्यंत धक्कादायक आहे.

त्यांच्या अकाली जाण्याने बहुजन चळवळीचे अपरिमित नुकसान झालं आहे.

अध्यक्ष आनंद तांबे यांनीही आदरांजली वाहीली.यावेळी उपाध्यक्ष नरेंद्र तांबे, सहसचिव संदेश डॉ.सोमनाथ कदम,सुनील तांबे, श्रीधर तांबे,संतोष तांबे आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today