सिंधुदुर्ग Today न्यूज

 


नांदगाव ग्रामपंचायत च्या वतीने माजी सैनिकांचा करण्यात आला सन्मान

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत विविध उपक्रम

नांदगाव / ऋषिकेश मोरजकर

नांदगाव ग्रामपंचायत च्या वतीने आज आझादी का अमृत महोत्सव वर्ष निमित्त 14 ऑगस्ट या दरम्यान माजी सैनिकांचा सन्मान करण्याचा आदेश शासनाचा असल्याने याच अनुषंगाने आज नांदगाव येथील माजी सैनिकांचा सन्मान नांदगाव ग्रामपंचायत च्या वतीने वृक्ष गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.

आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत आज नांदगाव ग्रामपंचायत येथे ध्वजारोहण कार्यक्रम नांदगाव मधली वाडी येथील माजी पोलीस अधिकारी श्री सहदेव सिताराम पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी विविध मान्यवर मंडळी उपस्थित होते.

      स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत माझी माती माझा देश या उपक्रमांतर्गत आज दिनांक 14 ऑगस्ट 2023 रोजी ग्रामपंचायत नांदगाव तर्फे विविध उपक्रम राबविण्यात आले  त्यामध्ये प्रथम ध्वजारोहण गावातील निवृत्त पोलीस सहदेव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर शीला फलकाचे अनावरण करण्यात आले,  गावातील माझी सैनिक सेवानिवृत्त पोलीस व त्यांचे कुटुंबीय यांचा शाल ,श्रीफळ, वृक्ष देऊन सन्मान करण्यात आला .त्याचप्रमाणे उपस्थित सर्वांनी पंचप्राण शपथ घेतली.नंतर  रवळनाथ मंदिर येथे अमृत वाटिकेमध्ये वसुधा वंदन उपक्रमांतर्गत 75 देशी रोपांची लागवड करण्यात आली. आहे.

         यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर उपसरपंच इरफान साटविलकर, ग्रामविकास अधिकारी मंगेश राणे, पंचायत समिती माजी सदस्या सौ हर्षदा वाळके, माजी सरपंच शशिकांत शेटये, संजय पाटील,सर्व ग्रामपंचायत सदस्य, आरोग्य सेविका,आशा सेविका,  अंगणवाडी सेविका,शिक्षक वृंद नागरिक ग्रामस्थ उपस्थित होते.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today