सिंधुदुर्ग Today

 


पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती सिंधुदुर्ग जिल्हा निमंत्रकपदी लक्ष्मीकांत भावे

 समन्वयक पदाची जबाबदारी कुडाळचे पत्रकार गुरूप्रसाद वामन दळवी

 ऋषिकेश मोरजकर | कणकवली 

पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती सिंधुदुर्ग जिल्हा निमंत्रक म्हणून कणकवलीचे पत्रकार लक्ष्मीकांत मनोहर भावे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.. समन्वयक पदाची जबाबदारी कुडाळचे पत्रकार गुरूप्रसाद वामन दळवी यांच्याकडे सोपविण्यात आली असल्याची माहिती राज्य निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी दिली.

राज्यात पत्रकारांवर हल्ल्याचे प्रमाण वाढले असून  हल्ल्याबाबत कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठी पत्रकार परिषदेचे राज्य निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी केल्या आहेत.ही नियुक्ती पुढील दोन वर्षांसाठी आहे. 


पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती सिंधुदुर्ग जिल्हा निमंत्रक म्हणून कणकवलीचे पत्रकार लक्ष्मीकांत मनोहर भावे यांची नियुक्ती करण्यात आली असून लक्ष्मीकांत भावे हे गेली 25 वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पत्रकारिता करीत आहेत कणकवली तालुका पत्रकार समितीचे अध्यक्षपद यापूर्वी त्यांनी भूषविले आहे.

समन्वयक पदाची जबाबदारी कुडाळचे पत्रकार गुरूप्रसाद वामन दळवी यांच्याकडे सोपविण्यात आली असून गुरूप्रसाद वामन दळवी हे गेली अनेक वर्षे सिंधुदुर्गात पत्रकारिता करत असून अन्यायविरोधात आवाज उठवण्यात ते नेहमीच अग्रभागी राहिले आहेत.

लक्ष्मीकांत भावे व गुरूप्रसाद  दळवी यांचे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे पदाधिकारी गजानन नाईक गणेश जेठे यांनी अभिनंदन केले आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today