सिंधुदुर्ग today
फुगडी,उखणी आणि गाणी,
बावशीत रंगणार श्रावण रंग
ऍड. प्राजक्ता शिंदे,ऍड.मेघना सावंत यांचेही मार्गदर्शन
बावशी सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक प्रतिष्ठानतर्फे आयोजन
कणकवली/ऋषिकेश मोरजकर
बावशी सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक प्रतिष्ठानतर्फे रविवार 10 सप्टेंबर रोजी दु. ३ वा. बावशी गावठाण गणेश मंदिराच्या सभागृहात महिलांसाठी "श्रावण रंग" या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम महिलांना आणि विद्यार्थांना प्रबोधनपर मार्गदर्शन आणि मनोरंजन अशा स्वरूपाचा ठेवण्यात आला आहे. यात ऍड. प्राजक्ता शिंदे यांचे "आत्मविश्वास आणि महिलांचा व्यक्तिमत्व विकास" या विषयावर तर ऍड. मेघना सावंत यांचे "कायदा आणि महिलांचे हक्क" या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. त्याचबरोबर सर्व स्तरातील महिलांसाठी "फुगडी, उखाणे आणि गाणी" या मनोरंजनाच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सर्व महिलांसाठी खुला असून या कार्यक्रमात कोणत्याही महिला सहभागी होऊ शकतात.कार्यक्रमाचे संयोजन बावशी सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक प्रतिष्ठानच्या पदाधिकारी सुवर्ण राणे, मनीषा राणे, सुहासिनी कांडर, वनिता कांडर, संजीवनी नार्वेकर आणि रोहिणी कांडर यांनी केले आहे.
बावशी सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक प्रतिष्ठान विद्यार्थी आणि महिलांसाठी तसेच गावच्या सामाजिक विकासासाठी कार्यरत असून श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर सदर "श्रावण रंग" या महिलांसाठीच्या सांस्कृतिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अलीकडेच या प्रतिष्ठानतर्फे शिक्षक गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याला गावातील महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. या पार्श्वभूमीवर गावातील महिलांच्या आग्रहाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात कोणत्याही गावातील महिला सहभागी होऊन फुगडी सादर करू शकतात. यासाठी प्रवेश फी नाही. या कार्यक्रमासंदर्भात अधिक माहितीसाठी सुहासिनी कांडर ( 96374 41548) यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष विलास कांडर आणि कार्यवाह समीर मयेकर यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा