सिंधुदुर्ग today
तोंडवली येथे कृषी कन्यांनी दाखविले शेततळ्याचे प्रात्यक्षिक.
नांदगाव प्रतिनिधी
कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषी उद्योजकता जागरूकता विकास योजनेअंतर्गत तोंडवली गावात विविध प्रात्यक्षिकांचे आयोजन केले . त्यापैकी एक म्हणजे शेततळ्याचे प्रात्यक्षिक होय .
प्रामुख्याने कोकणातील शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते . रब्बी हंगामात उद्भवणारी पाण्याची टंचाई ओळखून कृषी कंन्यांनी शेतकऱ्यांना शेततळ्यांचे प्रात्यक्षिक दाखवून त्याचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून दिले. तोंडवली ग्रामस्थांनी या प्रात्यक्षिकात उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला .
यामध्ये कृषी कन्या स्नेहल पाटील ,प्रगती पाटील, वैष्णवी शेटे ,कीर्ती पाटील ,सानिका कांबळे ,वैष्णवी पाटील, अंजली पाटील ,पियुषा मांजरेकर यांनी श्रमदान केले . यांना कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. संते सर, श्री शिर्के सर, सुखवे मॅडम , पाटणकर मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा