सिंधुदुर्ग Today न्यूज

 


स्वातंत्र्यदिनानिमित्त तोंडवली येथे कृषी कन्यांनी केले विविध कार्यक्रम

नांदगाव प्रतिनिधी 

      कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय येथील कृषी कन्यांनी ग्रामीण कृषी उद्योजकता जागरूकता विकास योजना 20 23 -24 अंतर्गत तोंडवली येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

     यामध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृण धान्य वर्ष 2023 याबद्दल जागरूकता निर्माण केली तृणधान्याचे प्रतीक म्हणून त्यांनी राजगिऱ्याच्या लाडूचे वाटप केले .भारताला           विकसनशील कडून विकसित राष्ट्र घडविण्यासाठी मेरी मिट्टी मेरा देश या योजनेअंतर्गत प्रतिज्ञा घेऊन शेतकऱ्यांना मातीच्या आरोग्याचे महत्त्व पटवून दिले.

     शालेय विद्यार्थ्यांमध्ये कृषी विषयक आपुलकी निर्माण करण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच गावामध्ये कृषी दिंडी काढण्यात आली .त्याचप्रमाणे शाळा व ग्रामपंचायतीचे कृषी कन्याने वृक्षारोपण केले.

      यावेळी तोंडवली बावशी गृप ग्रामपंचायतीचे सरपंच सौ.मनाली गुरव,माजी उपसरपंच अशोक बोभाटे, ग्रामसेवक श्री चव्हाण तसेच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते . त्याचप्रमाणे स्नेहल पाटील प्रगती पाटील वैष्णवी शेटे अंजली पाटील सानिका कांबळे कीर्ती पाटील वैष्णवी पाटील श्रुती खारकर यांचा सहभाग होता तसेच प्राध्यापक श्री पंकज  सर श्री शिर्के सर डॉ. शेलार सर व पाटणकर मॅडम यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. तोंडवली येथे कृषी कन्यांनी केले विविध कार्यक्रम

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today