पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सिंधुदुर्ग today

इमेज
                                *.                        ◼️पाहिजेत*◼️  *👉कणकवली स्थित स्पेअर पार्ट च्या दुकानात काम करण्यासाठी एक मुलगा बारावी ते ग्रॅज्युएट तसेच मुली बारावी पास जरुरी आहे.*  *👉त्वरित भरणे आहे कंम्प्युटरचे ज्ञान आवश्यक तसेच कणकवली व आजूबाजूच्या परिसरातील उमेदवारांना प्राधान्य.* ======================= *◼️ संपर्क 📱9867656527 /7037766618* ======================= * सिंधुदुर्ग today डिजिटल न्यूज चॅनल*

सिंधुदुर्ग today

इमेज
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 38 गड किल्ले मध्ये नांदगाव किल्ल्याचीही शासन दप्तरी नोंद. नांदगाव गड किल्ल्यातील माती मालवण किल्ला येथे उद्या नेण्यात येणार. जिल्हा परिषद कडून आलेल्या आदेशानुसार नांदगाव ग्रामपंचायत कडून पूर्व तयारी. नांदगाव ऋषिकेश मोरजकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासन दप्तरी 38 गड किल्ले मध्ये कणकवली तालुक्यातील नांदगाव किल्ल्याचाही समावेश आहे . कणकवली तालुक्यात नांदगाव व  खारेपाटण या गावात किल्ला म्हणून नोंद आहे. नांदगाव कोटाचा माळ म्हणून सुपरिचित असलेल्या ठीकाणी ही नोंद असल्याचे दिसून आले आहे. जिल्हा परिषद कडून या 38 किल्ल्यातील माती गोळा करून ती एकत्रित मालवण किल्ला येथे उद्या दिनांक 1 नोव्हेंबर रोजी नेण्यात येणार आहे. म्हणून आज जिल्हा परिषद कडून आलेल्या आदेशानुसार नांदगाव ग्रामपंचायत कडून पूर्व तयारी करून पुरोहित यांच्या हस्ते विधीवत पुजा माती गोळा करण्यात आली आहे .        नांदगाव ग्रामपंचायत नजीक कोटाचा माळ म्हणून प्रसिद्ध असलेले ठिकाण आहे.शासन दरबारी त्याची नांदगाव किल्ला अशी नोंद आहे. त्याचा पूर्व इतिहास पाहता जुने जाणते जाणकार लोक तिथे पागेचा माळ नाव...

सिंधुदुर्ग today

इमेज
महाराष्ट्र नवनिर्माण लॉटरी विक्रेता सेना आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिर कणकवली प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण लॉटरी विक्रेता सेना अध्यक्ष गणेश जगन्नाथ कदम यांच्या वाढदिवसानिमित्त 3 नोव्हेंबर रोजी लॉरेन्स अँड मेयो मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सदर शिबिर सकाळी 10 ते 4 पर्यंत श्री भवानी सभागृह तेळीआळी मनसे कार्यालयाच्या जवळ कणकवली येथे होणार आहे तरी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक श्री सुनिल प्रभाकर सोनार, श्री समीर तेली, श्री सुधीर राऊळ यांनी केले आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
कोळोशी पोलिस पाटील संजय गोरुले यांना आंतर राष्ट्रीय पुरस्कार प्रदान कणकवली (ऋषिकेश मोरजकर)  कणकवली तालुक्यातील कोळोशी पोलिस पाटील संजय गोरुले यांना आंतर राष्ट्रीय पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला आहे.यामुळे सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.        सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रीय पुरस्कार सन्माननीत राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा बेळगाव नॅशनल डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्यावतीने राज्यांमध्ये घोषित झालेले महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघाचे सदस्य तसेच सिंधुदुर्ग  कणकवली तालुका खजिनदार  पोलीस पाटील कोळोशी श्री संजय गोरुले यांचा राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पार पडला आहे यावेळी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस पाटील कणकवली तसेच कुडाळ संघटनेचे तालुका सचिव श्री राजेश जानकर यावेळी कणकवली तालुक्यातील अनेक पोलीस पाटील या कार्यक्रमाला उपस्थित होते तालुकाध्यक्ष उदय सावंत ,उपाध्यक्ष नारायण गावकर, सचिव विश्वास सावंत, नामदेव राणे , श्वेता राऊळ , आरती गाडी  , रवींद्र जाधव , सुनील पवार ,तेजस गोरुले, संदीप नानचे, मनोहर आंबेरकर, संदेश पारकर आदी उपस्थि...

सिंधुदुर्ग today

इमेज
तळेरे - गगनबावडा रस्ता दुर्दशेबाबत ठाकरे शिवसेनेतर्फे उद्या पदयात्रा. जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांची माहिती. करुळ ते नाधवडे अशा पदयात्रेत रस्ता दुर्दशेचीही पाहणी करणार. जनतेनेही पदयात्रेत सहभागी होण्याचे पारकर यांचे‌ आवाहन. कणकवली : प्रतिनिधी  तळेरे ते गगनबावडा रस्त्याची अक्षरश: दुर्दशा झाली असून त्याचा परिणाम ऊस वाहतूक, सिलिका, अन्य मालवाहतूक व सर्वच वाहनधारकांना होत आहे. रस्ता दुपदरीकरणाबाबत २०२२ मध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तरी देखील या रस्त्याचे अद्यापही काम सुरु न झाल्याबाबत शासनाला जाग आणण्यासाठी उद्धव ठाकरे शिवसेनेतर्फे करूळ ते नाधवडे अशी पदयात्रा सोमवार, ३० ऑक्टोबरला सकाळी ९ वा. काढण्यात येत आहे. पदयात्रेचा शुभारंभ पक्षाचे नेते तथा खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते होणार असून‌ पदयात्रेत आमदार वैभव नाईक, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, उपनेते गौरीशंकर खोत यांच्यासह पक्षाचे सर्व महत्वाचे नेते, पदाधिकारी सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी दिली आहे. पारकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, रस्त्याची दुर्दशा झाल्याने त्याचा या मार्ग...

सिंधुदुर्ग today

इमेज
समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गचा समाज साहित्य कादंबरी पुरस्कार विजय जावळे यांच्या 'लेकमात ' कादंबरीला तर  भूमी काव्य पुरस्कार कवी डॉ अनिल धाकू कांबळी यांच्या ' इश्टक ' काव्यसंग्रहाला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर, कार्यवाह वैभव साटम यांची माहिती मुंबईत होणाऱ्या समाज साहित्य संमेलनात पुरस्काराचे वितरण कणकवली/प्रतिनिधी      समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गतर्फे देण्यात येणाऱ्या काशिराम आत्माराम साटम स्मृती  समाज साहित्य कादंबरी पुरस्कारासाठी हर्मिस प्रकाशनाने (,पुणे) प्रकाशित केलेल्या कादंबरीकार विजय जावळे (बिड) लिखित ' लेकमात ' या कादंबरीची निवड करण्यात आली आहे. तर प्रकाश रामचंद्र रसाळ स्मृती प्रित्यर्थ देण्यात येणाऱ्या भूमी काव्य पुरस्कारासाठी पार पब्लिकेशनतर्फे (मुंबई) प्रकाशित करण्यात आलेल्या कवी डॉ अनिल धाकू कांबळी  (नांदगांव - कणकवली) यांच्या ' इश्टक ' या काव्यसंग्रहाची निवड करण्यात आली आहे. प्रत्येकी दहा हजार रुपये, स्मृतिचिन्ह, शाल आणि ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर, कार्यवाह वैभव साटम ...

सिंधुदुर्ग today

इमेज
इतिहासकार गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर पुरस्कार ज्येष्ठ अभ्यासक चंद्रकांत वानखडे यांना जाहीर. समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गतर्फे पुरस्काराचे आयोजन. प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर, कार्यवाह वैभव साटम यांची माहिती. कणकवली/प्रतिनिधी      समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गतर्फे देण्यात येणारा सिंधुदुर्ग (केळुस) सुपुत्र, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पहिले गुरू इतिहासकार कृष्णराव अर्जुन केळुसकर पुरस्कार ज्येष्ठ लेखक,संपादक,विचारवंत, 'गांधी का मरत नाही' या बहुचर्चित ग्रंथाचे लेखक चंद्रकांत वानखडे (नागपूर) यांना जाहीर झाला आहे. दहा हजार रुपये, स्मृती चिन्ह, शाल आणि ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप असून डिसेंबर मध्ये मुंबई येथे होणाऱ्या समाज साहित्य संमेलनात सदर पुरस्काराने श्री वानखडे यांना गौरविण्यात येणार आहे.अशी माहिती समाज साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर, प्रमुख कार्यवाहक वैभव साटम यांनी दिली.       या पुरस्कार योजनेचे परीक्षक म्हणून ज्येष्ठ कादंबरीकार राजन गवस, समीक्षक प्रा.डॉ.नितीन रिंढे, प्रा.डॉ.रणधीर शिंदे यांनी काम पाहिले. यापूर्वी हा प...

सिंधुदुर्ग today

इमेज
मावळे आम्ही स्वराज्याचे यांचा अनोखा उपक्रम  किल्ल्याला तोरण बांधून दसरा साजरा. सिंधुदुर्ग प्रतिनिधी  मावळे आम्ही स्वराज्याचे महाराष्ट्र राज्य अंतर्गत कणकवली विभागाने देवगड किल्ल्यावर तर मुंबई विभागाने किल्ले बेलापूर या ठिकाणी किल्ल्याला तोरण बांधून दसरा साजरा केला.     आधी तोरण गडाला नंतर आपल्या घराला असा नारा संघाचे अध्यक्ष श्री .सुमित कुशे यांनी या वेळी दिला     या वेळी संघाचे उपाध्यक्ष सचिन दोन्हे, उप सेक्रेटरी सुशांत परब, संघ खजिनदार धनंजय कोंबे,  सिंधुदुर्ग उपजिल्हा प्रमुख अनंत आचरेकर, अनिकेत तर्फे, दत्ताराम अमृते , सिद्धेश बडमे, दिनेश आंबेरकर इत्यादी उपस्थिती होते.

सिंधुदुर्ग today

इमेज
  जात नको म्हणणारेच सर्वाधिक जातीयवादी. सावंतवाडी समता प्रेरणा भूमी व्याख्यानात कवी अजय कांडर यांचे प्रतिपादन. कार्यक्रमाला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद. सावंतवाडी/ऋषिकेश मोरजकर       आज जातीजाती नुसार महामानव वाटून घेण्यात आले असून एकाबाजूला जात नको म्हणायची आणि दुसऱ्या बाजूला जातीचेच गट पाडत बसायचे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनीच अशा लोकांची चिकित्सा करायला सांगितले असून परीवर्तन चळवळीतील अशा संधी साधू, ढोंगी लोकांपासून प्रामाणिक कार्यकर्त्याने सावध रहावे.मात्र वैदिक परंपरा नाकारली तरच जात नष्ट होण्याची शकते राहते.रोटी - बेटी व्यवहाराने जात जाण्याची शक्यताच कमी असे स्पष्ट प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी अजय कांडर यांनी सावंतवाडी येथे केले.        डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी   एका खून खटल्याच्या निमित्ताने सावंतवाडी येथे भेट दिलेल्या घटनेला यावर्षी ९१ वर्षे झाली.या निमित्ताने सावंतवाडी समता प्रेरणा भूमी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कवी कांडर यांचे 'बाबासाहेब समजून घेताना ' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले.समता प्रेरणा भूमीचे अध्यक...

सिंधुदुर्ग today

इमेज
आज सावंतवाडीत कवी अजय कांडर यांचे व्याख्यान सावंतवाडी/ऋषिकेश मोरजकर     भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सावंतवाडी येथे भेट दिली.या घटणेच्या आठवणी जपण्यात येत आहेत.या पार्श्वभूमीवर रविवार २२ ऑक्टोंबर रोजी सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात दुपारी १२ वाजता सुप्रसिद्ध कवी अजय कांडर यांच्या 'बाबासाहेब समजून घेताना' या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.       आंबेडकर चळवळीतील अग्रगण्य कार्यकर्ते डी.के. पडेलकर हे या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी असून सावंतवाडी समता प्रेरणा भूमीच्या सभागृहात हे व्याख्यान होणार आहे.      डॉ.बाबासाहेब यांनी सावंतवाडीला भेट दिली. ही इतिहासक घटना आहे.या निमित्ताने समता प्रेरणा प्रबोधन जागर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी परीवर्तन चळवळीतील कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव रवळनाथ मंदिर येथे उद्या डबलभारी भजनांचा जंगी सामना सौ.योगिता परब विरुद्ध  कु.रिया मेस्त्री यांच्यात रंगणार सामना नांदगाव | ऋषिकेश मोरजकर  श्री देव रवळनाथ,पूर्वाईदेवी ,दिर्बाईदेवी,मूळ आकार श्री गणेश मंदिर,भुमी आकार नवरात्र उत्सव समिती नांदगाव च्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त उद्या रविवार दिनांक २२ ऑक्टोबर २०२३ रात्री ९ .०० वा. महीला बुवा यांच्या डबलभारी भजनांचा जंगी   आयोजित करण्यात आला आहे.     यामध्ये श्री  देव केसरकर  हनुमान प्रा. महिला भजन मंडळ कुडाळ बुवा सौ.योगिता परब (पवार ) विरुद्ध श्री स्वामी समर्थ नवतरुणी भजन मंडळ लोरे नं 1 नरामवाडी ता - कणकवली, येथील बुवा - कु .रिया राजेश मेस्त्री यांच्यात सामना रंगणार आहे.तरी सर्वांनी डबलभारी भजनांचा जंगी सामना पहाण्याची संधी दवडू नका असे आवाहन करण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
गावच्या विकासाचा आराखडा बनवताना परिपूर्ण तयार करा. - अरुण चव्हाण ग्रामपंचायत विकास आराखडा  प्रशिक्षण कार्यशाळा ; सरपंचांनी कुटुंबांचा,वाडी ,गावच्या गरजा ओळखून आराखडा बनवावा. कणकवली |(ऋषिकेश मोरजकर) कणकवली कणकवली तालुक्यातील सर्व नवनिर्वाचित  सरपंचांनी गावचा विकास आराखडा करताना परिपूर्ण आणि विचारपूर्वक करणे आवश्यक आहे. आराखड्यात काम सुचवताना संबंधित विकास कामाच्या जमिनीचा प्रश्न लक्षात घेऊनच सुचवली पाहिजेत. १०० टक्के निधी खर्च करण्याच्या दृष्टीने आराखडा आवश्यक आहे ,नुसता कॉपी-पेस्ट आराखडा करू नका. त्यामुळे विकास कामे होताना अडचणी निर्माण होत आहेत. सरपंचांनी  कुटुंबाचा, वाडीचा आणि संपूर्ण गावाचा अभ्यास करुनच आणि गरजा ओळखून आराखडा बनवावा,असे प्रतिपादन कणकवली पंचायत समिती गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी केले. कणकवली येथील भगवती मंगल कार्यालय येथे राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा परिषद, पंचायत समिती कणकवली च्या वतीने आयोजित ग्रामपंचायत विकास आराखडा सरपंच,ग्रामविकास अधिकारी ,ग्रामसेवक दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीर शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.यावेळी व्यास...

सिंधुदुर्ग today

इमेज
आयनल नवरात्रोत्सव साजरा करण्यास पार्टी नं. १ ला परवानगी कार्यकारी दंडाधिकाऱ्यांच्या दोन्ही गटांना बंदी आदेशाला जिल्हा न्यायालयाकडून स्थगिती. प्रतिनिधी |कणकवली आयनल येथील श्री देवी पावणाई मंदिरातील नवरात्रोत्सवाबाबत येथील कार्यकारी दंडाधिकारी यांनी दोन्ही गटांना लागू केलेल्या बंदी आदेशाला जिल्हा न्यायालयाने स्थगिती दिली आहे. पार्टी नं. १ चे गंगाराम साटम गटाला उत्सव साजरा करण्याची परवानगी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र. १ सानिका जोशी यांनी दिली आहे. गंगाराम साटम यांच्यावतीने अॅड. संग्राम देसाई, अॅड. उमेश सावंत, अॅड. सुहास साटम यांनी काम पाहिले. १५ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर या कालावधीत साजऱ्या होणाऱ्या आयनल येथील श्री देवी पावणाईच्या नवरात्रोत्सवाबाबत पार्टी नं. १ गंगाराम साटम वगैरे ३ व पार्टी नं. २ चे गजानन साटम वगैरे ५ यांच्यात मानपानावरून वाद आहे. याबाबत पोलीस निरीक्षकांनी कार्यकारी दंडाधिकारी यांना दोन्ही गटांना बंदी लावण्याचा अहवाल सादर केला होता. दरम्यान पार्टी नं. १ यांच्यातील प्रवीण साटम यांनी स्वतंत्र भूमिका घेत पार्टी नं. १ ला विरोध केला होता. कलम १४४ च्या सुनावणीत कार्यकारी द...

सिंधुदुर्ग today

इमेज
  एपीआय सागर खंडागळे यांची जामिनावर मुक्तता. अँड राजेंद्र रावराणे व अँड प्राजक्ता शिंदे यांचा युक्तिवाद. ऋषिकेश मोरजकर | कणकवली     सावंतवाडी पोलीस स्टेशन येथील लाच लुचपत प्रतिबंधक कायदा कलम ७ व ७ अ अन्वये अटकेत असलेले एपीआय सागर खंडागळे यांना रक्कम रुपये ५०,००० वर मुक्तता करण्याचे आदेश जिल्हा न्यायाधीश १ तथा विशेष न्यायधीश सिंधुदुर्ग  सानिका जोशी यांनी दिले.एपीआय  खंडागळे यांच्या वतीने अँड राजेंद्र रावराणे व अँड प्राजक्ता शिंदे यांनी काम पहिले.               तक्रारदार सिद्धांत परब यांनी लाच लुचपत प्रतिबंध विभाग रायगड कँम्प सावंतवाडी यांचेकडे एपीआय सागर खंडागळे व पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील हे आपल्याकडे लाचेची मागणी करत असलेबाबत  तक्रार दाखल केली होती.      त्यानंतर खंडागळे यांनी एक लाख रुपये लाचेची रक्कम स्वीकारल्या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबधक पथकाने त्यांस अटक केलेली होती. त्यांच्या वतीने जामीन मिळावा यासाठी विशेष न्यायाधीश सिंधुदुर्ग यांच्या न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आलेला होता. सदर अर्ज...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव येथे खासदार विनायक राऊत यांचे स्वागत. नांदगाव प्रतिनिधी खासदार विनायक राऊत यांची  नेतेपदी नियुक्ती झाल्याबद्दल नांदगाव पंचक्रोशी उबाठा शिवसेनेच्या वतीने त्यांचा आज नांदगाव तिठा येथे सत्कार करण्यात आला.     यावेळी उबाठा सेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर ,अतुल रावराणे , सुशांत नाईक, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मज्जित बटवाले ,तात्या निकम ,राजा नावलेकर ,चंद्रकांत डांबरे, रमीजान बटवाले,शाखाप्रमुख डगरे ,अब्बास बटवाले, लक्ष्मण लोके , सुभाष इंदप, तुकाराम गुरव ,सिद्धार्थ तांबे ,स्वप्निल ,याकूब ,बक्कर नावलेकर , उस्मान पाटणकर ,मुजा बोबडे,.   अझरुद्दीन कुणकेरकर , मोहम्मद साठविलकर ,पाटणकर उपस्थित  असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव हाय. येथे सायबर सुरक्षा विषयावर मार्गदर्शन संपन्न. नांदगाव| प्रतिनिधी नांदगाव येथील सरस्वती हायस्कूल येथे आयोजित करण्यात आलेल्या सायबर सुरक्षा या विषयावरील कार्यक्रम नुकताच संपन्न झाला आहे. सदर कार्यक्रम सरस्वती हायस्कूल नांदगाव  या विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी  'सायबर सिक्युरिटी' या विषयावर जिल्हा पोलीस विभाग सायबर क्राईम डिपार्टमेंट  यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.        यावेळी संस्थेचे चेअरमन नागेश मोरये, पोलिस उपनिरीक्षक हाडळ, पोलिस हवालदार श्री झोरे, मुख्याध्यापक श्री सुधीर तांबे तसेच सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.    आपणांस  आपला सायबर गुन्हेगारांपासून कसा बचाव करता येईल याबाबतचे अतिशय महत्त्वपूर्ण आणि उद्बोधक मार्गदर्शनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

सिंधुदुर्ग today

इमेज
पोलीस पाटील संघटनेच्या वतीने समस्यांबाबत आमदार गोपीचंद पडळकर यांना देण्यात आले निवेदन कणकवली प्रतिनिधी पोलीस पाटील संघटनेच्या वतीने विविध समस्यांबाबत आमदार गोपीचंद पडळकर यांना निवेदन देण्यात आले. आमदार श्री गोपीचंद पडळकर सिंधुदुर्ग दौऱ्यावर असते वेळी  पोलीस पाटील संघाच्या वतीने कणकवली तालुका पदाधिकारी व पोलीस पाटील यांनी पोलीस पाटलांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात निवेदन दिले . यावेळी पोलीस पाटील संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव होम मिनिस्टर कार्यक्रमाला महीलांचा उस्फुर्त प्रतिसाद. अनिता बांदेकर ठरल्या होम मिनिस्टर मानकरी स्वप्नाली मोरजकर व्दितीय तर अस्मिता मोरये तृतीय  कणकवली | प्रतिनिधी  श्री देव रवळनाथ, पूर्वाईदेवी, दिर्बाईदेवी ,मूळ आकार ,श्री गणेश मंदिर,भूमी आकार नवरात्र उत्सव समिती नांदगाव च्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त आज कोण जिंकणार पैठणी होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.       यात प्रथम पैठणी मानकरी ठरली आहे अनिता अनिल बांदेकर, उपविजेते स्वप्नाली सुरेश मोरजकर , तृतीय क्रमांक अस्मिता शामसुंदर मोरये यांना आकर्षक पैठणी साडी देण्यात आली आहे. तर सर्व सहभागी स्पर्धकांना साडी गिफ्ट देऊन गौरविण्यात आले आहे.पैठणी साडी व सर्व साड्या आदर्श ऊर्फ भाऊ मोरजकर यांनी पुरस्कृत केले होते.        यावेळी चंद्रकांत मोरये, शामसुंदर बिडये, संतोष मोरये, शामसुंदर मोरजकर, विलास मोरजकर , विठ्ठल बिडये आदी बहुसंख्येने उपस्थित होते. या होम मिनिस्टर कार्यक्रमाला महीलांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे.        हो मिनिस्टर कार्यक्रम सुत्रसंचलन ऋषिकेश ...

सिंधुदुर्ग today

इमेज
देवगड निपाणी महामार्गावर असलदे डामरेवाडी येथे भला मोठा वृक्ष कोसळला. दोन्ही कडील वाहतूक ठप्प.  नांदगाव ऋषिकेश मोरजकर देवगड निपाणी महामार्गावर असलदे डामरेवाडी येथे आज सायंकाळी 5.30 च्या सुमारास  झालेल्या वादळीवाऱ्यासह पाऊसामुळे भला मोठा वृक्ष कोसळला आहे. यामुळे  दोन्ही कडील वाहतूक ठप्प झाली आहे. अजून ही वाहतूक सुरळीत न झाल्याने वाहनचालकांची गैरसोय झाली आहे.       याबाबत संबंधित विभागाने जुनाट वृक्ष कोसळण्यापूर्वी तोडण्यात यावे अशी मागणी उपस्थितांमध्ये होत आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव व तोंडवली परीसरात अतिवृष्टीमुळे घरांवर झाडांची पडझड  नांदगाव ऋषिकेश मोरजकर  कणकवली तालुक्यातील नांदगाव व तोंडवली परीसरात वादळी वाऱ्यासह पाऊस व विजेच्या कडकडाटासह परतीचा धुवांधार पाऊस पडल्याने झाड घरावर व घरातील अंगणात कोसळून नुकसान झाले आहे.          नांदगाव वाशिनवाडी येथे गंगाराम साळुंखे यांच्या घरावर सागाच्या झाडाची भली मोठी फांदी पडल्याने मोठं नुकसान झालं आहे तसेच तोंडवली बोभाटेवाडी येथे श्री.नाना पांडुरंग बोभाटे यांचे राहत्या घराच्या समोरील अंगणाचे  मांडवावरील सिमेंटचे पत्र्यावर वादळ व अतिवृष्टीमुळे गुलमोहराचे झाडं पडून नुकसान झाले आहे. यामुळे परतीच्या वाटेवर असलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच काही झाडे विद्युत लाईन वर पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता 

सिंधुदुर्ग today

इमेज
प्रा.मधु दंडवते देशाचे पंतप्रधान होण्याची क्षमता असलेले नेते सावंतवाडी येथे प्रा. दंडवतेंवरील 'ध्यासपर्व' ग्रंथ प्रकाशन प्रसंगी कवी अजय कांडर यांचे प्रतिपादन लेखक प्रा.वैभव साटम, कवी मधुकर मातोंडकर यांची प्रमुख उपस्थिती कणकवली/ प्रतिनिधी    प्रा. मधु दंडवते हे देशाचे रेल्वेमंत्री आणि अर्थमंत्री होते.हा त्यांचा कार्यकाल दूरदृष्टीचा असल्यामुळेच कोकण रेल्वेचे स्वप्न साकारू शकले. त्यांच्यामध्ये देशाचे पंतप्रधान होण्याची क्षमता होती आणि ती त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत वेळोवेळी सिद्ध केली. त्यामुळे लेखक संजय रेंदाळकर यांनी निर्मिती केलेल्या प्रा.दंडवते यांच्या वरील 'ध्यासपर्व' या ग्रंथाचे मोल मोठे आहे असे प्रतिपादन नामवंत कवी अजय कांडर यांनी केले.       सावंतवाडी रेल्वे स्टेशन येथील प्रा.दंडवते प्रतिमे समोर कवी कांडर यांच्या हस्ते सदर ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला प्रसिध्द ललित लेखक प्रा वैभव साटम, कवी मधुकर मातोंडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बोलताना कांडर यांनी प्रा.दंडवते यांनी अर्थमंत्री असताना कोकण रेल्वे प्रकल्पाचे अर्थ नियोजन केले ...

सिंधुदुर्ग today

इमेज
कणकवली तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत नांदगाव हायस्कूलचे घवघवीत यश. कणकवली ( ऋषिकेश मोरजकर)  कणकवली तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत नांदगाव येथील सरस्वती हायस्कूल ने घवघवीत यश संपादन केले आहे.       क्रीडा शिक्षक श्री संजय सावंत यांच्या अनुभवी मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी संपादन केले आहे. या यशस्वी वाटचालीस संस्था अध्यक्ष श्री नागेश मोरये, उपाध्यक्ष श्री अंकुश डामरे ,खजिनदार श्री सुभाष बिडये, सचिव कृष्णा म्हसकर, संस्था सदस्य श्रीधर उर्फ दाजी मोरये यांनी शुभेच्छा देऊन कौतुक केले आहे .       स्पर्धेत प्रथम आलेल्या विद्यार्थी जिल्हास्तरावर खेळण्यासाठी पात्र ठरले आहेत सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना भरभरून आशीर्वाद दिले आहेत.     नेहा कदम 100 मिटर धावणे  प्रथम तर लांब उडी मध्ये व्दितीय, श्रावणी बिडये लांब उडी प्रथम व तिहेरी उडी प्रथम ,निकिता भडाचे गोळा फेक व्दितीय, आर्यन मोरये लांब उडी प्रथम, नितेश राणे 3000 हजार मिटर धावणे तृतीय क्रमांक , अपूर्वा अवधूत वाळके लांब उडी प्रथम, व 200 मिटर धावणे द्वितीय आणि 100 मिटर धावणे तृ...

सिंधुदुर्ग today

इमेज
  शिक्षिका मुमताज बेगम सफरअली इसफ यांना शैक्षणिक पुरस्कार. विविध मान्यवरांच्या उपस्थित सोलापूर येथे पुरस्काराने गौरव. कणकवली/ऋषिकेश मोरजकर        तिथवली (वैभववाडी) येथील रहिवाशी आणि प्राथ.उर्दू शाळा खारेपाटण - बंदरवाडी तसेच जि. प.प्राथ. उर्दू शाळा  उंबर्डे मेहबूबनगर मधील पूर्व शिक्षिका व सद्या सोलापूर माढा येथे शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या मुमताज बेगम सफरअली इसफ यांचा शैक्षणिक पुरस्काराने गौरव करण्यात आला. मुमताज बेगम सफरअली इसफ यांना आजादी बचाव हिंदी पत्रिकेतर्फे सदर पुरस्कार सोलापूर येथे एका सोहळ्यात प्रदान करण्यात आला.      श्रीम. मुमताज या तिथवली गावच्या असून सिंधुदुर्गातील प्रतिभावंत कवी सफरअली इसफ यांच्या त्या पत्नी आहेत. मुमताज बेगम सफरअली इसफ यांनी शालेय मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी उल्लेखनीय काम केल्याने त्यांना यावर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.     मुमताज बेगम सफरअली इसफ या सोलापूर जिल्ह्यातील जि. प. उर्दू माढा शाळेत सद्या शिक्षिका म्हणून सेवा बजावत आहेत. त्यांनी शाळेच्या भौतिक, शैक्षणिक, सोयीसुविधे...

सिंधुदुर्ग today

इमेज
  जिल्हा कबड्डी फेडरेशनच्या निवड चाचणीवर बहिष्कार.  कणकवली तालुक्यात कुठलीही निवड चाचणी होऊ न देण्याचा कणकवलीतील १४ कबड्डी संघाचा एकत्रित निर्णय. उत्तम सावंत / नांदगाव               कणकवली तालुक्यातील आजी माजी कबड्डीपटू,संघटक,आयोजक यांची नुकतीच सभा संपन्न झाली.यामध्ये कणकवली तालुक्यात सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनच्या निवड चाचणीवर बहिष्कार घालून यापुढे जिल्हा कबड्डी फेडरेशनची कुठलीही निवड चाचणी होऊ न देण्याचा निर्णय तालुक्यातील १४ संघानी एकत्रित घेतला.       सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनच्या मनमानी कारभाराला कंटाळून जिल्ह्यातील अनेक संघानी एकत्रित येऊन काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनच्या विरोधात आपली खदखद व्यक्त करून भुमिका स्पष्ट केली होती.त्यानंतर कणकवली तालुक्यातील कबड्डी संघ, संघटक,आयोजक यांनी कणकवली येथे नुकतीच चौडेश्वरी सभागृहात सभा आयोजित करून कबड्डीपटूंच्या हिताच्या दृष्टीने चर्चा करून तालुक्यातील १४ संघानी निवड चाचणीवर बहिष्कार घातला.यावेळी जिल्हा खेळाडू संघटक समिती यांनी जो निर्णय घेतला त...

सिंधुदुर्ग Today

इमेज
नांदगाव उबाठा सेनेचे कार्यकर्ते यांचा आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश  कणकवली | प्रतिनिधी  नांदगाव उबाठा सेनेचे कार्यकर्ते यांचा आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश झाला आहे     यावेळी जी.प.माजी अध्यक्ष  श्री.गोट्या सावंत ,कणकवली विधानसभा प्रमुख मनोज रावराणे, यूवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष संदीप मेस्त्री,कणकवली माजी नगराध्यक्ष समीर नलावडे,भाजपा तालुकध्यक्ष मिलिंद मेस्त्री,संतोष कानडे,कणकवली खरेदी विक्री संघाचे संचालक पंढरी वायंगणकर,नांदगाव सरपंच भाई मोरजकर,नांदगाव उपसरपंच इरफान  साटविलकर,माजी तंटामुक्ती अध्यक्ष रज्जाक बटवाले,कमलेश पाटील,यासीर मास्के,संतोष जाधव,मारुती मोरये तंटामुक्ती अध्यक्ष राजू तांबे सोबत प्रवेशकर्ते समीर नावळेकर,गुलाब पाटणकर ,कासम नाचरे ,हुसेन नावळेकर, आकिब नाचरे ,अमीन नावळेकर, हुसेन नावळेकर आदी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव येथे भाजपने लावले "चर्चा होऊ देतच बॅनर" नांदगाव | प्रतिनिधी  नुकताच कणकवली येथे उबाठासेनेने होवू दे चर्चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजप तर्फे चर्चा होऊ देतच असा ठिक ठिकाणी भले मोठे बॅनर लावण्यात आले आहे. यामध्ये सर्व विकास कामे झालेली आहेत याची माहिती प्रसिद्ध केली आहे. नांदगाव येथे ही आताच भारतीय जनता तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर , शक्ती केंद्रप्रमुख रविराज मोरजकर, उपसरपंच इरफान साठविलकर ,आयनल माजी सरपंच बापू फाटक, मारुती मोरये, कमलेश पाटील , यासीर मास्के, कृष्णा वायंगणकर, रघुनाथ लोके ,गोविंद लोके आदींनी नांदगाव तिठा येथे भले मोठे बॅनर लावण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
बालसाहित्य आणि आत्मचरित्रात्मक ग्रंथ पुरस्कारासाठी आवाहन पुरस्कारासाठी साहित्यकृती पाठविण्याची अंतिम तारीख 15 नोव्हेंबर 2023 कणकवली /प्रतिनिधी    संस्कृती प्रतिष्ठान इचलकरंजीतर्फे दरवर्षी साहित्य पुरस्कार दिले जातात. यावर्षी बाल साहित्य ग्रंथासाठी आणि लक्ष्मण कांबळे (जिंदा ) यांच्या स्मृती प्रित्यर्थ आत्मचरित्रात्मक ग्रंथासाठी पुरस्कार दिले जाणार असून लेखक किंवा प्रकाशकांनी आपल्या ग्रंथाची एक प्रत 15 नोव्हेंबर 2023 पर्यंत पाठवावी असे आवाहन इचलकरंजी संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महावीर कांबळे आणि सचिव अनुराधा काळे यांनी केले आहे.      इचलकरंजी संस्कृती प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी डिसेंबर मध्ये एक दिवशीय साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते. या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर विविध साहित्य प्रकारातील ग्रंथांना पुरस्काराने गौरवण्यात येते. यावर्षी 1 जानेवारी 2019 ते 31 डिसेंबर 2022 या मागील चार वर्षातील बालसाहित्य आणि आत्मचरित्र या साहित्य प्रकारातील ग्रंथांना प्रत्येकी 5000 रुपये, स्मृतीचिन्ह,शाल आणि ग्रंथ अशा स्वरूपाचे पारितोषिक देण्यात येणार आहे.      यापूर्वी ...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव तिठा येथे सरस्वती कॉलेज ऑफ नर्सिंग तोंडवली तर्फे स्वच्छता अभियान नांदगाव | प्रतिनिधी  स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आज सकाळी नांदगाव तिठा येथे सरस्वती कॉलेज ऑफ नर्सिंग तोंडवली तर्फे स्वच्छता अभियान श्री सरस्वती कॉलेज ऑफ नर्सिंग तोंडवली यांच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे.नांदगाव तिठा ब्रिज खाली, बाजारात स्वच्छता राबविण्यात आले आहे. यावेळी विद्यार्थ्यांसोबत नांदगाव सरपंच भाई मोरजकर, खरेदी विक्री संघाचे संचालक पंढरी वायंगणकर, तोंडवली बावशी सरपंच मनाली गुरव, अनंत आयनल माजी सरपंच बापू फाटक, अनंत परब, कमलेश पाटील, प्राचार्य  सौं शकुंतला नागराज ,प्राध्यापक श्री सागर भोसले, जयेश मोचेमाडकर, स्वप्नील सूळ,सुधाकर जाधव, कविता सावंत व  शिक्षकेतर कर्माचारी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग today

इमेज
विश्व हिंदू परिषद - बजरंग दल कोकण प्रांत शिवशौर्य यात्रेचे नांदगावात उस्फुर्त स्वागत. शिवराज्याभिषेक ३५० वे वर्ष.   कणकवली (ऋषिकेश मोरजकर) छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे हे ३५० वे वर्ष असून या निमित्ताने विश्व हिंदू परिषद - बजरंग दल कोकण प्रांत च्या वतीने शिवशौर्य यात्रेला काल  दोडामार्ग पासून सुरुवात झाली असून असून आज रविवार दिनांक १ ऑक्टोबर रोजी दुपारी ठिक 1 वा. नांदगाव तिठा येथे या  शिवशौर्य यात्रेचे आगमन झाले ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले आहे. दर्शन घेण्यासाठी शिवभक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.      यावेळी भारत माता की जय,जय जय जय भवानी जय जय जय शिवाजी आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला.      यावेळी सर्व प्रथम नांदगाव सरपंच भाई मोरजकर व संपूर्ण नांदगाव वासियांतर्फे स्वागत करण्यात आले. असलदे सरपंच चंद्रकांत डामरे, माजी सरपंच पंढरी वायंगणकर, आयनल माजी सरपंच बापू फाटक,ओटव सरपंच हेमंत परुळेकर,तोंडवली बावशी माजी उपसरपंच अशोक बोभाटे, व्यापारी संघटनेच्या वतीने पंढरी वायंगणकर, मारुती मोरये,  सुभाष बिडये तर ...