सिंधुदुर्ग today
नांदगाव रवळनाथ मंदिर येथे उद्या डबलभारी भजनांचा जंगी सामना
सौ.योगिता परब विरुद्ध कु.रिया मेस्त्री यांच्यात रंगणार सामना
नांदगाव | ऋषिकेश मोरजकर
श्री देव रवळनाथ,पूर्वाईदेवी ,दिर्बाईदेवी,मूळ आकार श्री गणेश मंदिर,भुमी आकार नवरात्र उत्सव समिती नांदगाव च्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त उद्या रविवार दिनांक २२ ऑक्टोबर २०२३ रात्री ९ .०० वा. महीला बुवा यांच्या डबलभारी भजनांचा जंगी आयोजित करण्यात आला आहे.
यामध्ये श्री देव केसरकर हनुमान प्रा. महिला भजन मंडळ कुडाळ बुवा सौ.योगिता परब (पवार ) विरुद्ध श्री स्वामी समर्थ नवतरुणी भजन
मंडळ लोरे नं 1 नरामवाडी ता - कणकवली, येथील बुवा - कु .रिया राजेश मेस्त्री यांच्यात सामना रंगणार आहे.तरी सर्वांनी डबलभारी भजनांचा जंगी सामना पहाण्याची संधी दवडू नका असे आवाहन करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा