सिंधुदुर्ग today
आज सावंतवाडीत कवी अजय कांडर यांचे व्याख्यान
सावंतवाडी/ऋषिकेश मोरजकर
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सावंतवाडी येथे भेट दिली.या घटणेच्या आठवणी जपण्यात येत आहेत.या पार्श्वभूमीवर रविवार २२ ऑक्टोंबर रोजी सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात दुपारी १२ वाजता सुप्रसिद्ध कवी अजय कांडर यांच्या 'बाबासाहेब समजून घेताना' या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
आंबेडकर चळवळीतील अग्रगण्य कार्यकर्ते डी.के. पडेलकर हे या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी असून सावंतवाडी समता प्रेरणा भूमीच्या सभागृहात हे व्याख्यान होणार आहे.
डॉ.बाबासाहेब यांनी सावंतवाडीला भेट दिली. ही इतिहासक घटना आहे.या निमित्ताने समता प्रेरणा प्रबोधन जागर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी परीवर्तन चळवळीतील कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा