सिंधुदुर्ग today
बालसाहित्य आणि आत्मचरित्रात्मक ग्रंथ पुरस्कारासाठी आवाहन
पुरस्कारासाठी साहित्यकृती पाठविण्याची अंतिम तारीख 15 नोव्हेंबर 2023
कणकवली /प्रतिनिधी
संस्कृती प्रतिष्ठान इचलकरंजीतर्फे दरवर्षी साहित्य पुरस्कार दिले जातात. यावर्षी बाल साहित्य ग्रंथासाठी आणि लक्ष्मण कांबळे (जिंदा ) यांच्या स्मृती प्रित्यर्थ आत्मचरित्रात्मक ग्रंथासाठी पुरस्कार दिले जाणार असून लेखक किंवा प्रकाशकांनी आपल्या ग्रंथाची एक प्रत 15 नोव्हेंबर 2023 पर्यंत पाठवावी असे आवाहन इचलकरंजी संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महावीर कांबळे आणि सचिव अनुराधा काळे यांनी केले आहे.
इचलकरंजी संस्कृती प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी डिसेंबर मध्ये एक दिवशीय साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते. या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर विविध साहित्य प्रकारातील ग्रंथांना पुरस्काराने गौरवण्यात येते. यावर्षी 1 जानेवारी 2019 ते 31 डिसेंबर 2022 या मागील चार वर्षातील बालसाहित्य आणि आत्मचरित्र या साहित्य प्रकारातील ग्रंथांना प्रत्येकी 5000 रुपये, स्मृतीचिन्ह,शाल आणि ग्रंथ अशा स्वरूपाचे पारितोषिक देण्यात येणार आहे.
यापूर्वी कादंबरी - कविता या साहित्य प्रकारांना पुरस्कार देण्यात आला. मान्यवर साहित्यिकांच्या परीक्षणाखाली या पुरस्कारासाठी ग्रंथ निवडले जातात. यात संस्था पदाधिकाऱ्यांचा कोणताही हस्तक्षेप राहत नाही. तरी संबंधितांनी आपले ग्रंथ पुढील पत्त्यावर पाठवावेत. ग्रंथ पाठविण्याचा पत्ता- पंडित बापू कांबळे, बापूगंधा, गुरुकुल कॉलनी, टाकवडे रोड, इचलकरंजी, ता. हातकणंगले जि- कोल्हापूर 41 61 15. अधिक माहितीसाठी संपर्क - 91461 06688
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा