सिंधुदुर्ग today

 


जात नको म्हणणारेच सर्वाधिक जातीयवादी.

सावंतवाडी समता प्रेरणा भूमी व्याख्यानात कवी अजय कांडर यांचे प्रतिपादन.

कार्यक्रमाला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद.

सावंतवाडी/ऋषिकेश मोरजकर

      आज जातीजाती नुसार महामानव वाटून घेण्यात आले असून एकाबाजूला जात नको म्हणायची आणि दुसऱ्या बाजूला जातीचेच गट पाडत बसायचे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनीच अशा लोकांची चिकित्सा करायला सांगितले असून परीवर्तन चळवळीतील अशा संधी साधू, ढोंगी लोकांपासून प्रामाणिक कार्यकर्त्याने सावध रहावे.मात्र वैदिक परंपरा नाकारली तरच जात नष्ट होण्याची शकते राहते.रोटी - बेटी व्यवहाराने जात जाण्याची शक्यताच कमी असे स्पष्ट प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी अजय कांडर यांनी सावंतवाडी येथे केले.

       डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी   एका खून खटल्याच्या निमित्ताने सावंतवाडी येथे भेट दिलेल्या घटनेला यावर्षी ९१ वर्षे झाली.या निमित्ताने सावंतवाडी समता प्रेरणा भूमी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कवी कांडर यांचे 'बाबासाहेब समजून घेताना ' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले.समता प्रेरणा भूमीचे अध्यक्ष डी के पडेलकर यांच्या अधक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला समता प्रेरणा भूमीचे सचिव मोहन जाधव, कार्याध्यक्ष अंकुश कदम,उपाध्यक्ष भावना कदम कैदी पडवेकर यांचे नातू संजय कदम, युवा कार्यकर्ते मिलिंद माटे, प्रसिद्ध साहित्यिक चंद्रकांत जाधव, सामाजिक कार्यकर्ते संतोष कदम,  रवी जाधव, कवी मधुकर मातोंडकर इत्यादी उपस्थित होते आदीसह विविध मान्यवर उपस्थित होते.

      कवी कांडर म्हणाले, बाबासाहेबांच्या काही अनोख्या कृतिशील विचारांनी माझ्यावर प्रभाव टाकला. त्यातून मी निखळ माणूस म्हणून जगण्याचा प्रयत्न चालविला आहे.हे बाबासाहेबांचे माझ्यावर मोठे ऋण आहेत.बाबासाहेबांच्या विचाराने जगणे म्हणजेच नैसर्गिक जगणे. नैसर्गिक जगणे म्हणजे भेदाची सर्व प्रकारची परंपरा नाकारत फक्त माणूस म्हणून जगणे. म्हणूनच मला फक्त एकट्या बाबासाहेबांच्या रक्तात जात, धर्म आणि देव दिसत नाही.

      आपण सगळेच जातीयवादी आहोत.आपल्या कुणाच्याच मनातून अद्याप आपापली जात गेलेली नाही. अनेकजण सांगत असतात मी जात मानत नाही, माझ्या घरी रोटी - बेटी व्यवहारही मी जातीच्या उतरंडीवरच्या वर्गाशी केले आहेत.पण असेच लोक सर्वाधिक जातीयवादी असण्याची शक्यता राहते.घरात तुम्ही तुमच्या सगळ्या गोष्टी

वैदिक जाती धर्मा नुसार करणार आणि बाहेर सांगणार मी जात मानत नाही.हा ढोंगीपणा असतो.

असा ढोंगीपणा अनेक पुरोगामी कार्यकर्त्यांचाही असतो तो आपण ओळखला पाहिजे. जातीअंत करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत.परंतु  त्यासाठी जो दृष्टिकोन विकसित व्हायला हवा तो झालेला अद्याप दिसत नाही.पण जातीअंत करण्यासाठी एकाच जातीतील लोक एकत्र येत असतील तर जातिअंत होईल कसा.मला माझ्या घरातच माझ्या आजी कडून बाबासाहेबांच्या विचाराची शिदोरी मिळाली.हिंदू स्त्रियांनी बाबासाहेबांचे ऋण कधी विसरू नये.जातीच्या उतरंडीवर ब्राह्मणांपासून शेवटच्या घटकापर्यंत सर्व जातीच्या स्त्रियांवर बाबासाहेबांचे मोठे ऋण आहेत. मात्र याची जाणीव सर्व जातीतील स्त्रियांना नाही. बाबासाहेबांनी आपल्या घरची स्त्री आपण व्यवस्थित संभाळली पाहिजे, तिचा कायम आदर केला पाहिजे असे सांगितले. बाबासाहेबांना समजून घ्यायचे असेल तर आधी त्यांच्या विरोधकांना समजून घ्यावे लागेल.आणि हे करताना दुसऱ्या बाजूला ज्यांना ज्यांना बाबासाहेबांच्या, बुद्धाच्या विचाराने हा समज घडवायचा असेल जातीअंत करायचा असेल त्यांनी वैदिक संस्कृती नाकारणे गरजेचे आहे. वैदिक संस्कृती नाकारली तरच जातीअंत शक्य आहे.

    कार्यक्रमाची प्रारंभ ममता जाधव यांच्या भीम गीताने व सत्यशोधक संगीतमय जलसाने करण्यात आला. संजय कदम यांचे हस्ते उद्घघाटन करण्यात आले.यावेळी झालेल्या विविध चर्चेत मिलिंद माटे,भावना कदम, संतोष कदम, रवी जाधव, विठ्ठल कदम, चंद्रशेखर जाधव, अनंत कदम शांताराम असंकर, सुरेश जाधव वाय.जी कदम महेश पेडणेकर यांनी भाग घेतला. डी के पडेलकर यांनी  शेवटी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर जाधव व दीपक जाधव यांनी केले.मधुकर मातोंडकर यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली.शेवटी मोहन जाधव यांनी आभार मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today